कागल : कागल शहरातील ३० कोटी विकासनिधीच्या ९६ विकासकामांचा एकत्रित प्रारंभ व लोकार्पण सोहळा सोमवार दि. ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता होत आहे. राज्याचे वैद्यकीय
शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा सोहळा होत आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता मातंग समाज येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. यासाठी शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केले आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने गोकुळचे संचालक युवराज पाटील, श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर आदी मान्यवरांची उपस्थिती आहे. विशेष रस्ता अनुदानातून शहरातील विविध विकास कामांसाठी १ कोटी २३ लाख ३६ हजार ६२१ ची कामे, नवीन मंजूर निधी मुस्लिम कब्रस्तान कंपाउंड वॉल बांधण्यासाठी ६० लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील विविध कामांसाठी २ कोटी ६० लाख २८ हजार २५९, नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना यासाठी ६४ लाख ६६ हजार ०६१, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेसाठी ८० लाख ४ हजार ५६१, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेसाठी ८५ लाख ६२ हजार ९५९. तसेच या योजने अंतर्गत इतर विविध विकास कामांसाठी १ कोटी ८८ लाख ३० हजार ८४५ इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ३ कोटी ५० लाख ९६ हजार ४०५ निधी मंजूर केला आहे.
यामध्ये रस्ते डांबरीकरण, खडीकरण, गटर्स, छत्रपती शिवाजीण महाराज व्यापारी संकुल, जयसिंगराव घाडगे व्यापारी संकुल येथील विविध कामे, काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीत सांस्कृतिक हॉल, परिसर स्वच्छता व इतर कामे, शाहूनगर बेघर वसाहतीमध्ये व्यायामशाळा, पाझर तलाव येथील स्वागत कमान व इतर कामे, कॅनॉलमध्ये पपिंग मशीन बसविणे, लक्ष्मी टेकडी येथे जलशुद्धीकरण केंद्र व ई-टॉयलेटचे बांधकाम आदी कामांचा समावेश आहे.
It seems like you’re repeating a set of comments that you might have come across on various websites or social media platforms. These comments typically include praise for the content, requests for improvement, and expressions of gratitude. Is there anything specific you’d like to discuss or inquire about regarding these comments? Feel free to let me know how I can assist you further!