कागल/ प्रतिनिधी : आरपीआय आठवले गट यांच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंती निमित्त आज शाहू महाराजांची जन्मभूमी कागल येथे त्यांचे जन्मठिकाणी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापुरुषांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला यावेळी शाहू राजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार पक्षाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी आरपीआय चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प. महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, कार्याध्यक्ष बी. आर. कांबळे, सरचिटणीस सचिन मोहिते, सात्ताप्पा हेगडे, आण्णाप्पा आवळे व कार्यकर्ते उपस्थित होते.