बातमी

निर्भीड आणि निःपक्ष उमेदवार ‘गणपती धनगर’

शिक्षक मतदार बंधू-भगिनीनो…..

      होऊ घातलेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये भटक्या विमुक्त जाती / जमाती या प्रवर्गातून ‘मासा’ हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून हा लढा देत आहे. संयमी नेतृत्व, सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच अनेक क्षेत्रात विद्यार्थी चमकलेले अशी माझी ओळख सर्व स्तरात आहे. माझी ओळख म्हणजे २५ वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये मी अध्यापन करीत आहे. गेली १४ वर्षे करवीर तालुक्यातील नंदगाव येथे शिक्षक, ११ वर्षे कागल तालुक्यात शिक्षक व प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, अध्यात्मिक आदी क्षेत्रात माझे कार्य चालू आहे.

             कोणत्याही सभासदाला संचालक होता यावे म्हणून माझी अपक्ष उमेदवारी. एका उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी विद्यमान व पराभूत यांना एकदाच संधी हवी व जिल्ह्यातील चेहरा हवा म्हणून माझी अपक्ष उमेदवारी. स्वतःच्या सद्सविवेक बुद्धीला स्मरून उमेदवारांची निवड करा. जिद्द, मेहनत व कष्ट करण्याची माझी तयारी म्हणूनच माझी अपक्ष उमेदवारी. लक्ष्मी घालते धाडसाला हार या उक्तीची प्रचीती यावी म्हणून माझी अपक्ष उमेदवारी. कोल्हापूर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षक बँकेत सभासदांची अपक्ष उमेदवार निवडून आणण्याची खात्री असल्यानेच माझी उमेदवारी.

आतापर्यंत एक तरी पदाधिकारी, लाखो रुपये खर्च करणाऱ्याला आणि विशेष म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींना उमेदवारी मिळते तर सामान्य सभासदाने कुठे जायचे ? म्हणून माजी अपक्ष उमेदवारी. सभासद हे दैवत मानून त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळावी यासाठी अपक्ष उमेदवारी. ही माझी पहिली आणि शेवटची निवडणूक असेल. कमी खर्चात बँकेची निवडणूक जिंकण्याची तयारी म्हणूनच माझी अपक्ष उमेदवारी. तुमचे आमचे नाते दृढ होण्यासाठी सभासद बंधू-भगिनींनो जरा विचार करा व अपक्ष उमेदवार बँकेत निवडून देऊन एक नवीन इतिहास घडवा.

अपक्ष उमेदवाराला निवडून देण्याची संधी आता नाही तर कधीच नाही. फक्त एकदाच उभे राहता येते हा एक अलिखित नियम घालून देण्यासाठी माझी उमेदवारी. आम्ही शिक्षक बंधू-भगिनी ठरवलं एक मत त्या अपक्षाच्या मासा या चिन्हालाच हाच नारा द्यायचा. 100% विजयाची खात्री असल्यानेच अपक्ष म्हणून माझी उमेदवारी. बँकेचा सभासद हाच माझा समाज म्हणून माझी उमेदवारी आहे. आणि तुम्हाला जर माहीतच आहे माशाला पोहायला शिकवण्याची गरज नसते म्हणून मासा हे चिन्ह निवडले आहे ! आपणच ठरवा एक मत अपक्षाच्या मासा या चिन्हाला आणि मगच आपल्या सद्सविवेक बुद्धीला पटणाऱ्या उमेदवारांना ! तुमच्या हक्काचा सक्षम असा अपक्ष उमेदवार श्री. गणपती काशिनाथ धनगर.

आपल्या बँकेच्या प्रगतीसाठी आपल्या जिल्ह्यातीलच अपक्ष उमेदवार म्हणून आपला पहिला शिक्का मासा या चिन्हावर मारा. बँकेच्या एकूण सभासदांपैकी कोणत्याही सभासद बंधु-भगिनीला कमीत कमी खर्चात निवडणूक लढवून जिंकता येते याचे उत्तम उदाहरण सर्व सभासदांना पर्यंत पोहोचण्यासाठी माझी अपक्ष उमेदवारी. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकी करता सन २०२२ ते २०२७ साठी अपक्ष उमेदवार हा संचालक म्हणून मी निवडून येणार अशी मला खात्री आहे.

शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्य व सर्व सभासदांविषयी आपुलकीची भावना असणारे, तुम्हा सर्व सभासदांचे उमेदवार म्हणून पहिली पसंती देऊन माझ्या ‘मासा’ या चिन्हावर आपल्या बहुमोल मताचा शिक्का मारून बहुमताने विजयी करा….!

आपलाच,

श्री. गणपती काशिनाथ धनगर

(प्र.मुख्याध्यापक, कुमार विद्यामंदिर, सिद्धनेर्ली, ता.कागल) 

एक मत ‘मासा’ चिन्हाला ….. बँकेच्या प्रगतीला !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *