कागल, दि. २३: महान क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीचा धगधगता अंगार होय, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे क्रांतिकारक सुभाषबाबू यांच्या जयंतीनिमित्त कागल शहरातील सुभाष चौक येथील पुतळ्याला आमदार श्री. मुश्रीफ यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बलिदान दिले. जुलमी ब्रिटिश राजवटीला हादरवून आणि घाबरून सोडणारे सुभाषबाबू यांचे व्यक्तिमत्व पिढ्यानपिढ्या भारतीयांना प्रेरणादायी ठरेल.
यावेळी माजी नगरसेवक बाबासो नाईक, दिलीप जांभळे, महेश मगर, राहुल चौगुले, संजय चौगुले, सनी जकाते, राहुल माने, मनोहर पाटील, नामदेव मगर, गणेश करंजे, धीरज खोत, सुरज खोत आदी मान्यवर उपस्थित होते.