बातमी

मानवतेवर आधारित समाज निर्मिती करणे आवश्यक – यशवंतराव थोरात

शाहू वाचनालय, प्रा. शामराव पाटील, संभाजी यादव राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्काराने सन्मानित

मुरगुड (शशी दरेकर) : बादशहा औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी वैर घेण्यापेक्षा मैत्री केली असती तर इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले असते. 1947 च्या फाळणीच्या वेदना आपल्याला भोगाव्या लागल्या नसत्या. भारतात धर्म आणि संस्कृतीचे विविध प्रवाह एक होऊन हिंदी महासागराला मिळाले असते. आजच्या राजकर्त्यांनी मानवतेवर आधारित समाज निर्मिती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ व नाबार्डचे माजी चेअरमन यशवंतराव थोरात यांनी केले.

ते शिवाजी आणि औरंगजेब यांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर गारगोटी ता. भुदरगड येथे गुणगौरव पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बजरंग देसाई होते.

या कार्यक्रमात पत्रकार प्रा. शाम पाटील यांनी पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ,संभाजी यादव यांना सामाजिक कार्याबद्दल विशेष गुणगौरव पुरस्कार 2023 देऊन यावेळी गौरवण्यात आले.

कार्यक्रमास मौनी विद्यापीठ चेअरमन मधुकर देसाई, विश्वस्त पल्लवी कोरगावकर, शामराव देसाई , भुदरगडचे पोलीस निरीक्षक सिंदकर,आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य कांबळे यांनी तर आभार संदीप कांबळे यांनी मांनले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *