बातमी

व्यापारी पतसंस्थेचे संचालक धोंडीराम मकानदार यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक व एम्.जे. अँग्रोचे चेअरमन आणि लकी सेवा केंदाचे मालक तसेच गणेश तरूण मंडळाचे जेष्ठ सदस्य मा. हाजी धोंडिराम मकानदार यांचा ६३ वा वाढदिवस श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी संचालक श्री. संदिप कांबळे यांनी संस्थेच्या केलेल्या त्यांच्या योगदानाबदद्ल कौतुक करून संस्थेमार्फत त्यांना दिर्घायुष्य लाभण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या वाढदिवस प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री. किरण गवाणकर, व्हा. चेअमन सौ. रोहिणी तांबट, संचालक सर्वश्री किशोर पोतदार, प्रशांत शहा, शशी दरेकर, नामदेवराव पाटील, साताप्पा पाटील, प्रदिप वेसणेकर, संदिप कांबळे, यशवंत परीट, महादेव तांबट, सुरेश जाधव, प्रकाश सणगर, कार्यलक्षी संचालक सुर्दशन हुंडेकर यांच्यासह चंद्रकांत माळवदे (सर), दिगंबर बोरगांवे, महिला कर्मचारी सुरेखा डवरी, सीमा मगदूम, कर्मचारी नितीश पाटील, विनायक हजारे, देवराज कांबळे यांच्यासह इतर कर्मचारीवर्ग उपस्थित होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *