बातमी

श्री. लक्षीनारायण पतसंस्थेचे संस्थापक संचालक जवाहर शहा यांचा वाढदिवस उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण सहकारी नागरी पतसंस्थचे संस्थापक संचालक, जैन श्वेतांबर मंदिराचे संस्थापक अध्यक्ष स्ट्रटी व व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष व मुरगूड बाजार पेठेतील जवाहर क्लॉथ सेंटरचे मालक मा. श्री. जवाहर शहा यांचा ८२ वा वाढदिवस मोठया उत्साहात संपन्न झाला.

मुरगूड येथील सर्व परिचित असणाऱ्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. किरण गवाणकर व संचालकानी त्यांच्या निवासस्थानीं जाऊन त्यांचा यथोचित सत्कार करून त्यानां शुभेच्छा दिल्या.

अनेक संस्थांचे पदाधिकारी , व्यापारी वर्गाने फोनवरून व प्रत्यक्ष भेटून त्यांच्या वाढदिवसानिमित्य अभिष्ठ चिंतन केले. या वाढदिवस प्रसंगी व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. किरण गवाणकर, संचालक सवश्री किशोर पोतदार, संदीप कांबळे, नूतन संचालक निवासराव कदम यांच्यासह सर्व संचालक, नागरीकानीं त्यानां उदंड दिर्घायुष्य लाभो असे अभिष्ठचिंतन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *