बातमी

मुरगूडच्या श्री व्यापारी नागरी पतसंस्थेला ५७ लाख१९ हजाराचा नफा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल सर्वांच्या आपुलकीची व रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणारी श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला २o२३-२४या आर्थिक वर्षात ५७ लाख१९ हजार इतका ढोबळ नफा झाला असून १८ कोटी ८८ लाख ठेवी आहेत तर ४० लाख६३ हजार चालू वर्षी तरतूद केली आहे.

सुरक्षित गुंतवणूक ६ कोटी६७ लाख केली आहे . कर्ज वितरण १४ कोटी४२ लाख केले आहे . अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री. किरण गवाणकर यानीं गहिनीनाथ समाचारशी बोलताना दिली.

गवाणकर म्हणाले वसुल भागभांडवल ३६ लाख३६हजार , राखीव व इतर निधी९१ लाख९६ हजार , रोख व बँक शिल्लक २९ लाख३० हजार , मालमत्ता ४१ लाख४७ हजार , इतर येणी २५ लाख८६ हजार, शिल्लक स्टेशनरी २ लाख७ हजार , व खेळते भांडवल२२ कोटी३६लाख आणि उलाढाल ११९ कोटी२० लाख इतकी आहे .थकबाकी० .५२टक्के आहे . तर सी .डी. रेशो ६६ .१९टक्के इतका आहे.

या रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या श्री .व्यापारी नागरी पतसंस्थेस कर्जदारानीं वेळेत कर्जाची परतफेड करुन सहकार्य केले आहे. सभासदांच्या विश्वासास पात्र राहून संचालक मंडळ कार्यरत आहे. नोकर वर्गाचेही आपुलकीने व  तप्तर सेवा देण्याचे कार्य सुरु आहे. त्यामुळेच श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था यशस्वीपणे रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत आहे.

यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन प्रकाश सणगर, संचालक प्रशांत शहा, किशोर पोतदार, साताप्पा पाटील, शशिकांत दरेकर, नामदेवराव पाटील, हाजी धोंडीराम मकानदार , निवास कदम, प्रदिप वेसणेकर, संदिप कांबळे, संचालिका सौ. सुनंदा जाधव, सौ. रोहिणी तांबट, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर संस्थेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

2 Replies to “मुरगूडच्या श्री व्यापारी नागरी पतसंस्थेला ५७ लाख१९ हजाराचा नफा

  1. I truly relished the effort you’ve invested here. The design is tasteful, your authored material fashionable, however, you seem to have acquired some unease about what you intend to present henceforth. Undoubtedly, I’ll revisit more regularly, similar to I have nearly all the time, in the event you sustain this rise.

  2. This website is an absolute gem! The content is incredibly well-researched, engaging, and valuable. I particularly enjoyed the [specific section] which provided unique insights I haven’t found elsewhere. Keep up the amazing work!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *