बातमी

मुरगूडच्या श्री लक्ष्मी नारायण पत संस्थेला विक्रमी २ कोटी ५२ लाख ७१ हजारांवर निव्वळ नफा – सभापती किशोर पोतदार

१०० कोटीच्यावर ठेवीचे उदिष्ट पूर्ण करत पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा तूरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सुवर्ण महोत्सवी श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्थेला २ कोटी ५२ लाख ७१ हजार ९९३ रूपयांचा ऐतिहासिक विक्रमी निव्वळ नफा झाला असून संस्थेने १०० कोटींचा ठेवीचा टप्पा पार केल्याची माहिती संस्थेचे सभापती  किशोर विष्णूपंत पोतदार यांनी दिली.

          संस्थेच्या ५८ वर्षाच्या इतिहासात इतका विक्रमी नफा मिळण्याची ही आनंददायी अशी घटना असून गत वर्षाच्या (२०२२-२३) वर्षाच्या तुलनेत यंदाच्या (२०२३-२४) आर्थिक वर्षात एकूण २१ लाख, १६ हजार ९४० रूपये इतकी वाढ झाल्याचे श्री पोतदार यांनी सांगितले.

           श्री पोतदार म्हणाले, ” संस्थेच्या मुरगूड मुख्य शाखेसह कुर (ता. भुदरगड) सरवडे (ता. राधानगरी), सावर्डे बु (ता कागल) व सेनापती कापशी (ता. कागल) एकुण ५ शाखा आहेत. या सर्व शाखा अतर्गत एकूण १०० कोटी ४२ लाख, २९ हजारांवर ठेवी झाल्या असून ६८ कोटी, २८ लाख २५ हजारांवर कर्ज वाटप झाले आहे. एकुण कर्ज वाटपांपैकी केवळ सोनेतारणावरच ४१ कोटी ९६ लाख ९४ हजारांचे कर्ज वाटप केले आहे.

              पोतदार म्हणाले, ” संस्थेची वार्षिक उलाढाल ४८० कोटी, ५४ लाख, ८४ हजारांवर आहे तर संस्थेचे खेळते भांडवल १५६ कोटी ३४ लाख, इतके विक्रमी झाले आहे. संस्थेकडील ३३१५ सभासदांचे, १ कोटी ९३ लाख, ९४ हजारांवर भागभांडवल जमा असुन, ४ कोटी, ९६ लाख, ७४ हजारांचा स्वनिधी आणि ३ कोटी, ५४ लाख, ३४ हजार राखीव निधी आहे. तसेच संस्थेची ४६ कोटी, ६६ लाख, ४३ हजारांची सुरक्षित गुंतवणूक असुन, थकबाकी प्रमाण ० टक्के आहे. एन.पी.ए शुन्य टक्के व सी.डी. रेशो ६१.४१ टक्के इतका आहे.

            श्री. पोतदार म्हणाले, ” संस्थेच्या या ऐतिहासिक दैदिप्यमान यशात संस्था उपसभापती दतात्रय कांबळे , संस्थापक संचालक जवाहर शहा, संचालक सर्व पुंडलीक डाफळे, दत्तात्रय तांबट, अनंत फर्नांडीस, रविंद्र खराडे, चंद्रकांत माळवदे, विनय पोतदार, रविंद्र सणगर, जगदीश देशपांडे, सौ. सुनिता शिंदे, श्रीमती भारती कामत, सौ सुजाता सुतार, कार्यकारी संचालक नवनाथ डवरी, सचिव मारूती सणगर, शाखाधिकारी सर्व सौ मनिषा सुर्यवंशी (मुरगूड) , राजेंद्र भोसले (सेनापती कापशी), के. डी. पाटील, सरवडे (ता. राधानगरी), रामदास शिऊडकर सावर्डे बु (ता कागल), अनिल सणगर – कुर (ता भुदरगड) यासह सर्व सेवकवृंद सभासद, ठेवीदार, कर्जदारांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *