मुरगूड (शशी दरेकर) : पेशाने डॉक्टर असूनसुद्धा आपल्याच दवाखान्यात तिसऱ्या नंबरच्या खोलीत तुळीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवार दि.१२ रोजी दुपारी २.२० च्या दरम्यान मुरगूड ता. कागल एस. टी. स्टँड परिसरात घडली असून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव डॉ.महेश रामचंद्र तेलवेकर (वय ४०) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मुरगूड येथे नानिबाई चिखली येथील डॉ.महेश तेलवेकर यांनी आपला ओम क्लिनिक नावाचा दवाखाना सुरू केला होता. पण दि.१२ रोजी दुपारी २.२० च्या दरम्यान डॉ. तेलवेकर यांनी तिसऱ्या नंबरच्या खोलीत तुळीला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले तेव्हा शिवाजी पांडुरंग कुंभार यांनी मुरगूड पोलीस स्टेशनला वर्दी दिली असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणी केली तर पुढील तपास सहाय्यक फौजदार एस. एच. चव्हाण व एम. एस. चव्हाण हे करीत आहेत.