बातमी

वंदूर मध्ये मुलाने केला आईचा निर्घृण खून

कागल / प्रतिनिधी : दारूच्या आहारी गेलेल्या लेकाने दारुला पैसै देण्यास आईने नकार दिला.नशेत लेकाने आईचा गळा घोटला. ही घटना कागल तालुक्यातील वंदूर येथील वांईंगडे मळ्यात बुधवारी रात्री उशिरा घडली.संशयीत आरोपी निलेश अशोक वांईंगडे वय वर्ष 30 यास कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीमती सुनिता अशोक वांईंगडे वय वर्ष 51 राहणार वंदूर वाईंगडे मळा असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खुनाची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.

कागल पोलीस ठाण्यातून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी निलेश हा अविवाहित आहे.ऊसतोड मजूर म्हणून तो काम करतोय . तो दारूच्या नशेत सतत असायचा. दारूच्या नशेमध्ये त्याने भिंतीवर डोके आपटले,व धारदार हत्याराने सपासप आईवर वार केले .तसेच सुती पांढऱ्या दोरीने गळा आवळला. त्यात ती जागीच गतप्राण झाली. आई सुनीता वाईंगडे व मुलगा निलेश वाईगडे हे दोघेच घरी राहत होते.

बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर पासून तो दारूच्या नशेत होता. त्याने रात्री आईचा निर्घृण खून केला.गुरुवार दिनांक 2 रोजी सकाळी त्याने दारु ढोसली. दारुच्या नशेत आपण आईचा खून केल्याचे शेजारी सांगितले. अज्ञात व्यक्तीने कागल पोलिसांना दूरध्वनी वरून खुनाची माहिती कळविली. घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत सुनिता ही मजुरी करत होती.. मुलानेच आईचा निर्घृण खून केल्याने वंदूर सह परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. खून घडलेल्या ठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी केली. एका निष्पाप महिलेचा गळा दाबुन,व धारदार हत्याराने सपासप वार करून खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

घटनास्थळी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी व कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. कागल पोलिसांनी पंचनामा केला. घटनास्थळी उपनिरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक शैलजा पाटील यांनी धाव घेतली.

पोलीस हवालदार अशोक पाटील, बाळू पटेकर, चिंतामणी बाबळे, विनायक औताडे, विजय पाटील, रवी पाटील यांनी पंचनामा केला. कुणाचा तपास केल्यानंतरच कोणाचे रहस्य उलगडणार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *