बातमी

शिवानी कानकेकर यांना राज्यस्तरीय उडान शिक्षकरत्न पुरस्कार

मुरगूड ( शशी दरेकर ): कोगील खुर्द (करवीर ) येथील विद्यामंदीर शाळेच्या अध्याlपिका सौ .शिवानी चंद्रशेखर कानकेकर ( कोल्हापूर ) यांना उडान फौंडेशन कोल्हापूर यांनी राज्यस्तरीय उडान शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.

यापूर्वी सौ . कानकेकर यांना पॅट्रीयट स्पोर्टस् ग्रुपचा २००६ चा आदर्श शिक्षक पुरस्कार, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजचा २०१८ नेशन बिल्डर ॲवाॅर्ड, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना क्रांतीज्योती सावित्रीची लेक गुणवंत शिक्षिका पुरस्कार -२०२१ ,चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ,चंदगड २०२१ चा उखाणा स्पर्धा प्रथम क्रमांक , सर फौंडेशन कोल्हापूरचा नारीशक्ती सन्मान २०२१,श्री.भैरवनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, म्हारूळ यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार , २०२१चा कोरोना मुक्ती संदेशदूत पुरस्कार असे पुरस्कार मिळालेले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *