बातमी

पतसंस्थाच सामान्यांचा मोठा आधार ; संजय घाटगे
केनवडे येथे अन्नपूर्णा पत संस्थेमार्फत सभासदांना 13 टक्के डेव्हिडंट वाटप

व्हनाळी(सागर लोहार) : ग्रामीण भागातील शेती आणि शेतकरी यांचे आर्थिक गणित हे पिकांच्या बाजारभावावर अवलंबून असते पण गत दोन वर्षे आलेला कोरोना ,वाढलेली महागाई यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे अशा अडचणीतील शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील पतसंस्था हाच मोठा आर्थिक आधार ठरत आहे असे प्रतिपादन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले

केनवडे ता कागल येथे अन्नपूर्णा भैरवनाथ पतसंस्थे मार्फत सभासदांना डेव्हिडंट वाटप प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सातापा तांबेकर होते.

यावेळी संस्थेच्या सभासदांना दीपावलीनिमित्त 13 टक्के डेव्हिडंट रकमेचे वाटप माजी आमदार संजयबाबा घाटगे, आनंदा तळेकर ,मॅनेजर तानाजी कांबळे, संचालक विष्णुअण्णा गायकवाड, बाजीराव पाटील, शामराव पोवार यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री घाटगे पुढे म्हणाले, दरवर्षी महापूर अतिवृष्टी यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते यामुळे उत्पन्न कमी मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण होते .अशा आर्थिक परिस्थितीतीत शेतकऱ्यांना पतसंस्थाच आधार देतात शिवाय या संस्थेचा कारभार ही पारदर्शी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास संचालक दगडू चौगले ,आनंदा खंडागळे, शामराव पवार, बाजीराव पाटील (केनवडे) धोंडीराम एकशिंगे, सभासद राजाराम लोखंडे ,प्रकाश तळेकर, तुकाराम मगदूम ,सातापा मगदूम ,सदाशिव तांबेकर आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *