कागल : छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुक दरम्यान झालेली धक्काबुक्कीचा राग मनात धरुन अनिकेत पाटील (सोमवार पेठ, कागल), अनिकेत गुरव (बाळासाहेब ठाकरे चौक, कागल), महेश गुरव (बाळासाहेब ठाकरे चौक, कागल) यांनी स्वप्निल लक्ष्मण मोहीते (किर्लोस्करवाडी), अक्षय आप्पासो मर्दाने यांना मारहाण केली असून

याबाबत कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून स्वप्निल लक्ष्मण मोहीते व त्यांचे मित्र अक्षय मर्दाने, गणेश सुर्यवंशी यांचेसोबत नक्षत्र हॉटेलमध्ये जेवण करणेकरीता जात असताना.
नक्षत्र बार येथे बोलवून मिरवणुकीतील धक्काबुक्की बद्दल जाब विचारत बारमधील खुर्ची स्वप्नील याच्या डोक्यात मारली तसेच अक्षय याला हि मारहाण करून धमकी दिली. सदर गुन्हाच तपास पो.हे.कॉ. पाटील करीत आहेत.