मुरगूडच्या एम जे लकी इंटरनॅशनल स्कूलला कागल तालुक्याचे संगणक परीक्षा केंद्राची मंजुरी

मुरगूड ( शशी दरेकर )   महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मुरगूड येथील एम जे लकी इंटरनॅशनल स्कूल ला संगणक टायपिंग चे कागल तालुक्याचे अधिकृत परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष व्ही आर भोसले यांचे हस्ते आणि एम जे इंटरनॅशनल चेअरमन हाजी धोंडीराम मकानदार यांच्या उपस्थितीत पूजन करून व फित कापून या केंद्राचे उद्घाटन … Read more

Advertisements

अंगारकी संकष्टी निमित्य ७ एस टी बसेस मुरगूडहून गणपतीपुळ्याला रवाना.

मुरगूड ( शशी दरेकर ) : एस टी संगे तीर्थाटन योजनेंतर्गत अंगारकी संकष्टी निमित्य मुरगूडहून ७ एस टी बसेस गणपतीपुळे येथे रवाना झाल्या.  नूतन नगरसेविका सौ.सुजाता जगन्नाथ पुजारी ,स्थानक प्रमुख सागर पाटील. श्री .व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक प्रशांत शहा, पत्रकार शाम पाटील, वि. रा.भोसले ,राजू चव्हाण यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.गणपती बाप्पा मोरया च्या … Read more

शुभेच्छांच्या वर्षावात मुरगूड शहर पत्रकार संघाच्या पत्रकार भवनचा प्रवेश सोहळा उत्साहात

माजी खासदार संजय मंडलिक, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीतसिंह घाटगे प्रमुख उपस्थित मुरगूड ( शशी दरेकर ) : ४० वर्षाची प्रतीक्षा, कसोटी व संघर्षाचे अनेक क्षण पाठीशी बांधत असंख्य दातृत्वाच्या हातांनी मुरगूड शहर पत्रकार संघाच्या नव्या वास्तूचे स्वप्न अखेर साकार झाले. जिल्ह्यासह तालुक्यातील मातब्बर राजकीय नेते, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, राजकीय, विविध क्षेत्रातील सामाजिक संस्था, संघटना … Read more

गणपती बाप्पा मोरया! च्या गजरात लालपरीची भक्तीवारी

मुरगुड पंचक्रोशीतील भाविक थेट गणपतीपुळ्याकडे रवाना! मुरगुड ( शशी दरेकर ) : नवीन वर्षाची पहिली पहाट भक्ती आणि श्रद्धेच्या तेजाने उजळून निघाली… ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात मुरगुड पंचक्रोशीतील शेकडो भाविक एस टी च्या लालपरीतून थेट श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शनासाठी रवाना झाले. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाविकांसाठी थेट … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १८ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १८ दिनांक ०८-०१-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

मुरगूड शहर पत्रकार भवनचा आज दि.०४ जानेवारी रोजी भव्य शुभारंभ.

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील शहर पत्रकार भवन वास्तु प्रवेश सोहळा रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी मुरगूड येथे पार पडणार आहे. गेली अनेक वर्ष पत्रकारांच्या स्वप्नातील हे पत्रकार भवन मुरगूड नगरपरिषद आणि सन्माननीय देणगीदार यांच्या बहुमोल सहकार्यातून उभारले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उभारले जाणारे हे पहिलेच पत्रकार भवन असल्यामुळे राज्यभर या पत्रकार … Read more

अंगारकी संकष्टीचा मंगल प्रवास गारगोटी व मुरगुडातून तब्बल १० बसेस थेट गणपतीपुळ्याला

अंगारकी संकष्टीला प्रवाशानां थेट प्रवासाची सोय मुरगुड (शशी दरेकर) : नवीन वर्षाची सुरुवात गणरायाच्या चरणस्पर्शाने व्हावी म्हणुन मुरगुड व गारगोटी पंचक्रोशीतील हजारो भाविक एसटीच्या लालपरीने थेट गणपतीपुळे येथे जात आहेत. त्यासाठी मुरगुड येथून ७ तर गारगोटी येथून ३ एसटी बसेस आरक्षित झाल्या आहेत.       नवीन वर्षाची सुरुवात भक्तिभावाने आणि सुखकर प्रवासाने व्हावी यासाठी एसटी महामंडळाने … Read more

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजन नाईक यांचे निधन

मुरगूड ( प्रतिनिधी ) मुरगुड तालुका कागल येथील पशुवैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना मुरगुडचे डॉ. राजन नाईक यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन झाले.    मुरगूड परिसरातील शेतकरी व पशुपालक  यांचे आधारवड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक तरुण शिकाऊ डॉक्टर घडवून त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्यांच्या दरम्यान पशुसंवर्धन विभागाच्या दिनांक ३१ … Read more

निधन वार्ता साताबाई बाबुराव देशमुख

मुरगूड (प्रतिनिधी ) श्रीमती साताबाई बाबुराव देशमुख वय ९७ निढोरी ता.कागल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.पश्चात दोन मुले,मुलगी,सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस एकनाथराव देशमुख यांच्या त्या मातोश्री व मुरगूड विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका वाय.ई.देशमुख यांच्या सासुबाई होत.रक्षा विसर्जन गुरुवार १ रोजी निढोरी येथे सकाळी ९ वाजता आहे.

विद्यामंदिर कुंभारगेट यमगे, विज्ञान प्रदर्शनात कागल तालुक्यात द्वितीय

मुरगूड ( शशी दरेकर ) बिद्री तालुका कागल येथे पार पडलेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यामंदिर कुंभारगेट यमगे, ता. कागल या शाळेने सादर केलेल्या घरच्या घरी सेंद्रिय खत बनवण्याचे  मोबाईल यंत्र या उपकरणास १ ली ते ५ वी या लहान गटातमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. रासायनिक शेतीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या, पारंपरिक खत … Read more

error: Content is protected !!