बातमी

मुरगुड बसस्थानक येथील बंद असलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू न केल्यास एसटी रोको आंदोलनाचा इशारा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड बस स्थानकामध्ये सुरू असणाऱ्या लांब पल्ल्याच्या पंढरपूर अक्कलकोट या सध्या सुरू असलेल्या आणि पूर्वी बेळगाव, मुंबई या गाड्या सुरू करण्याची मागणी आज नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. मुरगुड शहरांमध्ये बसच्या अनेक फेऱ्या गारगोटी डेपो मार्फत सुरू आहेत. या फेऱ्या उत्पन्नाचे कारण देत बंद करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरहून येणारी शेवटची बस देखील नागरिकांच्या सोयीसाठी असून देखील ती बंद करण्यात आली आहे.

त्याचबरोबर पुणे गाडीवर गारगोटी मुरगुड पुणे असा बोर्ड लावून ही गाडी पुणे येथे नेण्यात येते याबाबत नागरिक संतप्त झाले होते . यानुसार प्रवासी नागरिक व्यापारी विद्यार्थी यांनी आज मुरगूड बस स्थानक येथे निवेदन दिले. एकाच मार्गावर बस सुरू असून देखील गारगोटी पंढरपूर अक्कलकोट बसचे उत्पन्न जास्त आणि मुरगुडच्या गाड्या बंद का असा सवाल संतप्त नागरिक विचारताना दिसत होते.

मुरगुड मधून पंढरपूर अक्कलकोट सोलापूर सांगली येथे जाणाऱ्या परिसरांसाठी सोयीची आणि प्रवासांना परवडणारी सर्वसामान्यांची बस सुरू करण्यात आली होती . मात्र या गाडीला उत्पन्न होत नसल्याचे कारण देत या गाड्या बंद केल्या तसेच डेपो मार्फत सुरू करण्यात आलेल्या निपाणी आणि इतर देखील गाड्या बंद करण्यात आल्या आहेत.

तसेच या गाडीचे उत्पन्न कमी करण्यासाठी याच गाडीच्या पुढे गारगोटी बस स्थानकाची बस अगोदर सोडण्यात येते जेणेकरून जाणून बुजून मुरगूड मार्गावरील गाड्यांची उत्पन्न कमी व्हावे हा उद्देश ठेवून या बसचे वेळापत्रक तयार केले आहे काय ? असा देखील नागरिक संतप्त सवाल करत होते. वेळोवेळी अशा प्रकारची कृती गारगोटी डेपोतून होत असून ती खपवून घेतली जाणार नाही. पुन्हा या गाड्या सुरू न झाल्यास तसेच बंद झालेल्या पूर्वीच्या गाड्या पूर्ववत सुरू न झाल्यास या ठिकाणी मोठे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. यावेळी मुरगुड बस स्थानकाचे कंट्रोलर शशिकांत लिमकर यांनी निवेदन स्वीकारले.

या निवेदनाची प्रत गारगोटी आगारास देखील सादर करण्यात आली आहे. यावेळी सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, विनायक येरूडकर, प्रशांत शहा, उदय शहा, बाळासाहेब मकानदार, प्रदीप वेसनेकर, सुहास बहिरशेठ, बंदिश पोतदार, किरण गवाणकर, बबन पोतदार, सोमनाथ यारनाळकर, शशिकांत दरेकर, सुशांत मांगोरे, विशाल मंडलिक, रणजीत मोरबाळे यांच्यासह विद्यार्थी, प्रवासी शिवभक्त याच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व सामान्यांना परवडणारी अशी बस वाहतूक असते याच विश्वासाने गोरगरीब या गाड्यांमधून प्रवास करत असतात तसेच वारकऱ्यांना पंढरपूर या ठिकाणी जाण्यासाठी तसेच भावीक – भक्तांना अक्कलकोट पंढरपूर तुळजापूर या ठिकाणी जाण्यासाठी ही गाडी सोयीचे असताना ती अचानक का बंद करण्यात आली असा सवाल नागरिक विचारत आहेत

One Reply to “मुरगुड बसस्थानक येथील बंद असलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू न केल्यास एसटी रोको आंदोलनाचा इशारा

  1. certainly like your website but you need to take a look at the spelling on quite a few of your posts Many of them are rife with spelling problems and I find it very troublesome to inform the reality nevertheless I will definitely come back again

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *