मयत विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू, सासरच्यांवर गुन्हा दाखल

मुरगुड(शशी दरेकर): कागल तालुक्यातील चिमगाव येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती आणि सासरच्या लोकांनी पैशाची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याने नवविवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन 2005 साली मयत हिचा हर्षद नावाच्या मुलगा पाच महिन्याच्या असतानाच बेड वरुन जमिनी वरती पडला … Read more

Advertisements

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त कोल्हापुरात ‘पोस्टर्स स्पर्धेचे’ उत्साहात उद्घाटन

कोल्हापूर : जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त (१ मे ते १५ जून २०२५) जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, कोल्हापूर येथे तंबाखूमुक्तीची शपथ घेऊन पोस्टर्स स्पर्धेचे प्रदर्शन व उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. देशमुख यांनी तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा … Read more

शेतकऱ्यांनो, परदेशातील शेती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्या!

आता महिला शेतकरीही परदेशात जाऊन शिकणार! कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत ‘देशाबाहेरील अभ्यासदौरे’ ही योजना राबवली जात आहे. पुणे कृषी आयुक्तालयाच्या तंत्र अधिकाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. यावर्षी, म्हणजेच सन 2025-26 मध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, … Read more

मुरगुड शहरातील मटण मार्केटची दुरावस्था – मुख्याधिकारी यांना निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) : जवळजवळ चार दशके सुरू असलेले मुरगूड मधील मटण मार्केट आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मार्केट मधील दहा गाळ्यांपैकी आता फक्त एखादा दुसरा गाळा सुरू असतो. पाण्याची व्यवस्था पण नाही त्यामुळे विक्रेत्यांना लांबून पाणी आणावे लागते. सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य आहे.त्यामुळे ग्राहक नाके मुरडतात व बाहेरच्या बाहेर निघून जातात.मटण … Read more

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली आहे. गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे कोल्हापूरच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आता पूर्णविराम … Read more

‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आज ! नविद मुश्रीफ यांच्या नावाची जोरदार चर्चा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज (शुक्रवार, ३० मे रोजी) संचालक मंडळाची सभा होणार असून, या सभेत नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीला वेग आला आहे. गेले काही दिवस ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले … Read more

कागल मध्ये बेकायदेशीर गोमांस वाहतुकीवर पोलिसांची धाड; जेसीबीने केली विल्हेवाट, सात लाखांचा मुद्देमाल जप्त

कागल (सलीम शेख ): कागल पोलिसांनी बेकायदेशीर गोमांस वाहतुकीवर मोठी कारवाई करत हॉटेल अशोक समोरील बोदग्यातून विनापरवाना गोमांस घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे दोन हजार किलो गोमांसासह एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, हॉटेल अशोकसमोरून बेकायदेशीर गोमांसाची वाहतूक केली जात आहे. या … Read more

‘ऑगस्ट’चं धान्य ‘जून’मध्येच! लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

पावसाळ्यापूर्वी घ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतचं धान्य: शासनाचं आवाहन मुंबई, दि. २९: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत मोफत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्यासाठी, केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की, ऑगस्ट २०२५ पर्यंतचं अन्नधान्य आता ३० जून २०२५ पर्यंतच रास्तभाव दुकानांमधून … Read more

अवकाळी पावसाचा तडाखा: कोल्हापूर जिल्ह्यात तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कोल्हापूर : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शेती, फळपिके, घरे आणि गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. आज झालेल्या एका तातडीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित या बैठकीत जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी … Read more

येस बँकेच्या ATM मध्ये ₹4500 च्या बनावट नोटा जमा; कागलमध्ये खळबळ

कागल (विक्रांत कोरे): येस बँकेच्या एटीएम मध्ये मशीनद्वारे रुपये 11500 भरणा करण्यात आला होता. यामध्ये रुपये पाचशेच्या नऊ नोटा बनावट निघाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ही घटना तारीख 15 मे रोजी येस बँक शाखा  रिंग रोड, सागर बेकरी जवळ कागल येथे घडली.             मनोज कुमार पाच्छापुरे राहणार महावीर नगर हुपरी यांनी तारीख २५ मे रोजी … Read more

error: Content is protected !!