बातमी

‘अन्नपूर्णा’ ची दीड कोटींची एकरकमी बिले शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग चेअरमन संजय बाबा घाटगे ची माहिती; ऊसतोड वाहतूक यांचा समावेश

व्हनाळी(सागर लोहार) : केनवडे तालुका कागल येथील श्री अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्स लिमिटेड या कारखान्याकडे 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत पुरवठा झालेल्या ऊस बिलांची एकरकमी प्रति टनास 2903 प्रमाणे १ कोटी ३६ लाख रक्कम तसेच ऊस तोडणी वाहतूक बिले ३३ लाख अशा सुमारे दीड कोटींच्या एकरकमी बिलांची रक्कम ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तालुक्यात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री अन्नपूर्णा शुगर या कारखान्याने दरासंदर्भात कोणाशी स्पर्धा न करता पण इतर कारखान्यांच्या बरोबरीने पहिल्याच गळीत हंगामासाठी एकरकमी २९०३ रूपये दर जाहीर करून तो सर्वात आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्यामुळे यंदा ऊस उत्पादकांची दिवाळी गोड होणार असल्यामुळे शेतकऱ्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

बरोबरीने आणि सर्वात आधी….
अन्नपूर्णा शुगरने इतर कारखान्या बरोबर जो दर निघेल तो जाहीर केला आणि तो सर्वात आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग देखील केला, त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *