कागल(विक्रांत कोरे): शिव्या का देतोस असे आईने मुलग्यास विचारले, विचारल्याचा राग मनात धरून मुलाने आईवर हल्ला चढवला आणि मारहाण केली. त्यात आई जखमी झाली. तिच्यावर कागल ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. प्रशांत गणेश शिंदे राहणार कळमवाडी वसाहत कागल असे वेळाने मारहाण करणाऱ्या मुलाचे नाव आहे संगीता गणेश शिंदे(वय ४२) राहणार काळम्मावाडी वसाहत कागल असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रशांत संगीताचा सावत्र मुलगा आहे. या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली आहे अधिक तपास पोलिस नाईक पटेकर हे करीत आहेत.