बातमी

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान मुरगूडमध्ये आनंद उत्सव साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी दणदणीत बहुमत मिळवत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ रविवारी घेतली याच आनंदोत्सव संपूर्ण देशामध्ये साजरा करण्यात आला. मुरगुड शहरामध्ये  देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुरगूड येतील हिंदूवादी संघटना रामभक्त आणि शिवभक्त यांच्या वतीने शिवतीर्थ मुरगुड समोरील चौकामध्ये फटाके लावून साखर पेढे वाटून तर भाजपातर्फे बस स्थानक परिसर येथे साखर पेढे वाटून करण्यात आला.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी प्रसंगी हा दिवस संपूर्ण देशामध्ये आनंदोत्सव साजरा करण्याचे नियोजन सर्वच हिंदूवादी संघटना भाजपा राम भक्त आणि शिवभक्त यांनी घेतला होता . यानुसार सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी आणि साखरपेढ्याचे वाटप करून तोंड गोड करून हा दिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक सरकारचे तिसरी टर्म सुरू होणार असून याद्वारे देशाचा आणखीन विकास होईल असे गौरव उद्गार उपस्थित नागरिकांनी यावेळी काढले.

यावेळी शहरांमधील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी कागल तालुका भाजपा अध्यक्ष दगडू शेणवी, हिंदुत्ववादी संघटनेचे सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, जगदिश गुरव, प्रकाश पारिशवाड, अनुबोध गाडगीळ, रनजीत मोरबाळे, सोमनाथ  यारनाळकर, संग्राम डवरी,उमेश कुलकर्णी शिवाजी चौगुले , आनंदा रामाने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *