संपूर्ण गावातील महिला वर्गाकडून महानैवेद्य गारव्याचे आयोजन
मडिगले (जोतीराम पोवार) : महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र वाघापूर ता.भुदरगड येथील ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्वार नूतन मंदिराचा पायाभरणी शुभारंभ राधानगरी भुदरगड चे आमदार सौ व श्री प्रकाश आबिटकर व देवस्थान समितीचे अध्यक्ष व सरपंच सौ व श्री बापूसो आरडे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
तत्पूर्वी टाळ मृदंग, ढोल ताशे व पिपाणीच्या नादसूरात महिलांनी आणलेल्या महानैवेद्य गारवा याची गणेश मंदिरापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, तब्बल 3.50 साडेतीन कोटी खर्चून बांधण्यात येणारे या मंदिरासाठी आमदार आबिटकर यांनी निधी दिल्याबद्दल स्थानिक देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आबिटकर यांनी साडेतीन कोटी पेक्षाही भविष्यात लागणारा वाढीव निधी म्हणून 80 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले यावेळी सौ आबिटकर यांच्या हस्ते मानाच्या 25 सुहासिनींची खना नारळाने ओटी भरुन सन्मान करण्यात आला यावेळी भाविकांच्यातून मंदिर जीर्णोद्धारासाठी पहिल्याच दिवशी तीन लाख रुपये रोख देणगी स्वरूपात जमा झाले त्यांचाही मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम, बाबासाहेब नांदेकर, बाळूमामा देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, उपसरपंच सागर कांबळे, बाबुराव डोणे पुजारी, कृष्णात डोणे पुजारी, भगवान डोणे पुजारी, ज्योतिर्लिंग मंदिरातील सर्व पुजारी वर्ग पुरोहित विजय स्मार्त, स्थानिक देवस्थान समितीचे सर्व सदस्य, परिसरातून आलेले असंख्य भाविक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक राधानगरी मतदार संघाचे काँग्रेसचे समन्वयक सचिन घोरपडे यांनी मांडले तर आभार अर्जुन दाभोळे यांनी मांडले.