जोगव्यातुन जमा केलेल्या पैशातून आदमापूर प्राथमिक शाळेस एक लाखाची मदत
“तृतीय पंथीय “पांडुरंग गुरव ”यांची अनमोल मदत सभ्य समजणाऱ्या माणसांच्या डोळ्यात लख्ख अंजन घालणारी … “
मुरगूड ( शशी दरेकर ) : आसगोळी ता. चंदगड येथील तृतीयपंथी पांडुरंग गुरव यांचे आदमापूर हे मूळगाव नसताना आणि तेथील प्राथमिक शाळेशी काडीचाही संबंध नसतानाही जोगवा मागत जमा केलेले एक लाख रुपये स्वतः च्या वृद्धापकाळाचा विचार न करता प्राथमिक शाळेच्या बांधकामासाठी शाळेला दान केले आहेत .जोगवा मागत असताना पदरी बऱ्याचदा हेटाळणीच वाट्याला येणाऱ्या तृतीय पंथीयांनी शिक्षणासाठी केलेली अनमोल मदत समाजातील सभ्य समजणाऱ्या माणसांच्या डोळ्यात मात्र लख्ख अंजन घालणारी ठरली आहे .
आसगोळी ता. चंदगड येथील तृतीयपंथीय पांडुरंग गुरव हे गेली वीस वर्षे आदमापूर , वाघापूर व मुरगूड परिसरात जोगवा मागून चरितार्थ चालवत आहेत . येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बांधकामासाठी पैशांची गरज आहे . हे कळताच त्यांनी कशाचाही विचार न करता लोकांच्याकडून दहा , वीस , पन्नास अथवा १०० असा जोगवा मागत जमा केलेले पैसे आदमापूर प्राथमिक शाळेस मदत रुपाने देऊ केली .
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Best Online Schools in Kentucky, Explore the Options, Top-Rated Accredited Online Schools in Kentucky, Discover the Perfect Fit, Online Schools vs Traditional Schools in Kentucky, Affordable Online Schools in Kentucky, Online High Schools in Kentucky, Prepare for College, Online Elementary Schools in Kentucky, How Online Schools Work in Kentucky, A Closer Look at the Process
Online Schools in Kentucky [url=onlineschoolky1.com]onlineschoolky1.com[/url] .