
गडहिंग्लज – धनंजय शेटके
रविवारी तारीख २६ रोजी गडहिंग्लज मधील राणी लक्ष्मीबाई रोड वरील मडलगी ज्वेलर्स या सोन्याच्या शोरुम मध्ये सांगलीच्या एका युवकाने सोन्याची अंगठी,मंगळसूत्र, लॉकेट,गंठन,गळ्यातील चेन असे असे दागिने खरेदी केले तसेच जीएसटी सह एकूण ३ लाख २१ हजार रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले. तसेच काही रक्कम चेकेने देऊ केली शोरुम चे मॅनेजर रावसाहेब कुरळे यांना पैसे जमा झाल्याचा मेसेज पण दाखवला तसेच आपल्याला आणखीनही दागिने हवे आहेत असे सांगून त्याची ऑर्डर ही देऊ करून मोबाईल वरील पैसे सेंड झाल्याचा मेसेज चा स्क्रीनशॉट कुरळे यांच्या मोबाईल वर पाठवला. व तो युवक निघून गेला.त्या नंतर शोरुम मॅनेजर ने तो चेक बँकेत जमा केला असता चेक वटला नाही.

तसेच ऑनलाईन जमा झालेली रक्कम देखील बँकेच्या खात्यावर दिसत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे ज्वेलर्स मॅनेजर रावसाहेब कुरळे यांच्या लक्षात आले.या प्रकरणी कुरळे यांनी गडहिंग्लज पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिस निरीक्षक घुले अधिक तपास करीत आहेत.या प्रकारामुळे गडहिंग्लज शहरात खळबळ उडाली आहे.