बातमी

करनूर विद्यालय जुनियर कॉलेज च्या सौ शाकेरा मुजावर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

कागल(विक्रांत कोरे) : रोटरी क्लब ऑफ गार्गीज् कोल्हापूर यांच्या मार्फत देण्यात येणारा सन 2021 -22 वर्षाचा नेशन बिल्डर अवार्ड गुणवंत शिक्षिका पुरस्कार करनूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या आदर्श मुख्याध्यापिका सौ. शाकेरा हरुण मुजावर यांना देण्यात आला.

कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात माजी प्रांतपाल आर. आय डिस्ट्रिक्ट संग्राम पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. गतवर्षी डी. बी पाटील फाऊंडेशन यांच्या मार्फत देण्यात येणारा आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. त्यांच्या या पुरस्कारने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी पाच शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, संस्थेचे सचिव अबिद मुश्रीफ यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास सहा. प्रांतपाल डिस्ट्रिक्ट अमित माटे, डी.सी.सी. टीचर सपोर्ट डिस्ट्रिक्ट प्राचार्य डॉ. प्रशांत कांबळे,आर.डी.सी. (कोल्हापूर अर्बन) टीचर सपोर्ट डिस्ट्रिक्ट मेघना शेळके, रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपिका कुंभोजकर, सचिव अनघा पेंढारकर, लिटरसी चेअरमन शोभा तावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *