गडहिंग्लज आणि कागल तालुक्यातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा
कोल्हापूर, दि. 24 : कोल्हापूर कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असून कागल शहरातील उड्डाणपूल पिलर वरतीच करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे. त्यामुळे त्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करुन उड्डाणपूल लोकांच्या मागणीनुसार उभारावा, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कागल शहरातील रहिवाशांच्या अडचणी, वाहतूक, उसाच्या गाड्या आणि सांडपाणी याबाबतचे प्रश्न सुटावेत, अशी मागणी स्थानिकांची आहे. त्यानुसार बदल करुन राष्ट्रीय महामार्गांचे काम करावे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री, मुश्रीफ यांनी रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही उड्डाणपूल कामातील बदलाबाबत दुरध्वनीद्वारे चर्चा केली. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.