बातमी

सदाशिवराव मंडलीक महाविद्यालयाचे प्रा. डॉ . शिवाजी होडगे आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी मॉरिशसला रवाना

मुरगूड ( शशी दरेकर ) – मॉरिशस येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व अभ्यास दौऱ्यासाठी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. शिवाजी होडगे नुकतेच रवाना झाले आहेत. भारत मॉरिशस आंतर सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध, कला साहित्य आणि संस्कृती यास अनुसरून शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि मॉरिशस विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 आणि 24 नोव्हेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे .या चर्चासत्राच्या निमित्ताने भारत आणि मॉरिशस राजकीय सांस्कृतिक संबंध, मॉरिशस देशाची राजकीय सामाजिक परिस्थिती, शिक्षण कृषी साहित्य क्षेत्रातील वाटचाल, महात्मा गांधी आणि त्यांचे कार्य ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे, मराठी भाषेचा मॉरिशस मधील कला साहित्य आणि संस्कृतीवर काय व कसा परिणाम झाला याचा अभ्यास करणे आणि आंतरराष्ट्रीय संबंध याविषयी अभ्यास करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशा विविध बाबींचा समावेश असून उद्घाटक म्हणून मॉरिशसचे उपपंतप्रधान डॉ. अविनाश तिलक उपस्थित राहणार आहेत.

महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशसचे डायरेक्टर जनरल डॉ. राजकुमार रामप्रताप, डॉ. मधुमती कुंजल ,मॉरिशस मराठी फेडरेशनचे अध्यक्ष असंत गोविंद ,डॉ. बिदल अबा,शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव, समन्वयक डॉ.प्रकाश दुकळे उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रामध्ये प्रा. डॉ. शिवाजी होडगे हे “भारत मॉरिशियस मधील सांस्कृतिक सह संबंध (मॉरिशस मधील लग्नविधी या विषयाच्या अनुषंगाने)”या शोध निबंधाचे वाचन करणार आहेत. डॉ. होडगे यांना जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी मा.खासदार प्रा.संजय मंडलिक, विश्वस्थ मा.वीरेंद्र मंडलिक, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, कार्यवाह आण्‍णासो थोरवत यांचे सहकार्य लाभले तर महाविद्यालयाच्या सर्व स्टाफने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. डॉ.शिवाजी होडगे यांचे यापूर्वी विद्यापीठ, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. डॉ. होडगे यांचे अनेक सहकारी व शैक्षणिक संस्थेशी निकटचे संबंध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *