मुरगूड (शशी दरेकर) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड मधील युवती विकास मंच आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती मार्फत “अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत कामाच्या ठिकाणी महिलांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय “या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेचे उदघाटन माननीय प्राचार्य डॉक्टर ए. डी. कुंभार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यशाळेमध्ये प्रथम सत्रामध्ये एडवोकेट सौ रेखा खाशाबा भोसले यांचे “कामाच्या ठिकाणी महिलांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील कायदेविषयक कायद्यातील तरतुदी ” या विषयावर सखोल मार्गदर्शन झाले. द्वितीय सत्रामध्ये डॉक्टर सौ सुप्रिया मल्हार गोखले कुलकर्णी यांचे “कामाच्या ठिकाणी महिलांना भेडसावणाऱ्या शारीरिक समस्या व त्यावरील समस्या व त्यावरील उपाय” याविषयी मार्गदर्शन लाभले.
प्रथम सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉक्टर ए .डी. कुंभार यांनी यांनी भूषविले. तर द्वितीय सत्राचे अध्यक्षस्थान प्राध्यापक अर्चना कांबळे यांनी भूषविले. या कार्यशाळेमध्ये आभार प्राध्यापक सौ सोनाली कुराडे यांनी मांडले.
याप्रसंगी या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. टी .एम .पाटील, अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक प्रो डॉ. एस .एम .होडगे, डॉ. एम . ए . कोळी, दूध साखर महाविद्यालय, बिद्री च्या प्राध्यापक सौ. सलोनी पाटील व तेथील विद्यार्थिनी तसेच देवचंद महाविद्यालय, अर्जुन नगर च्या डॉ. आनंदी कांबळे व तेथील विद्यार्थिनी आणि सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड मधील सर्व विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ कार्यशाळे चे उदघाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले.
यानंतर कार्यशाळेच्या समन्वयक व विकास मंच आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती च्या प्रमुख डॉक्टर सौ माणिक शांतिनाथ पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले .तर सूत्रसंचालन कुमारी साक्षी कुलकर्णी, शितल तोडकर, व शबनम मुल्ला यांनी केले.