मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सर्वांच्या परिचयाची असणारी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या महिला कर्मचारी सौ . सुरेखा विठ्ठल डवरी, सौ. सीमा दिपक मगदूम, सौ. स्वाती किशोर पाटील , सौ. सिमा जठार, आश्विनी रणवरे व सभासद ,खातेदार सौ. प्रियांका इंद्रजित पाटील , सौ . राजश्री एकनाथ पाटील यांचा सत्कार चेअरमन श्री. किरण गवाणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
याप्रसंगी श्री . व्यापारी नागरी सह .पतस्थेचे चेअरमन किरण गवाणकर म्हणाले आजची स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने कार्य करू शकतात .एकाचवेळी अनेक कामे करण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये असल्याने परस्थितीची त्यानां चांगलीच जाण असते. आजच्या स्त्रीला कोणतेही क्षेत्र नवीन राहिलेले नाही . प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या समर्थपणे जबाबदाऱ्या पार पाडतानां दिसून येत आहेत . त्यांच्या कामांचे कौतूक करून त्यानीं महिला कर्मचाऱ्यानां शुभेच्छा दिल्या.
या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी उपसभापती सौ . रोहिणी तांबट , संचालक सवश्री साताप्पा पाटील , शशी दरेकर , नामदेवराव पाटील, प्रशांत शहा, किशोर पोतदार , हाजी धोंडीराम मकानदार, प्रदिप वेसणेकर, यशवंत परीट , प्रकाश सणगर, संदीप कांबळे , महादेव तांबट, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर ,यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता .