सिद्धनेर्ली (प्रतिनीधी) – माजी ग्रामविकास मंत्री, आमदार हसन मुश्रीफ याच्या वाढदिवसानिर्मित पिंपळगाव खुर्द ता कागल येथील ग्रामदैवत श्री बसवेश्वर देवालयात महाआरती आयोजित करण्यात आली होती.
मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील अंगणवाडी , प्राथमीक शाळा आदींमध्ये मुलांना फळे वाटप करण्यात आली. तसेच गावातील नागरिकांना दूध व अल्पोपहार याचे वाटप करण्यात आले.यावेळी गावात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी केक कापून हसन मुश्रीफ याचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी गावच्या सरपंच सौ.शीतल अमोल नवाळे, उपसरपंच सदाशिव चौगुले,एम आर चौगुले,महेश चौगुले,अशोक नवाळे, सह राष्ट्रवादी पक्षाचे ग्रामपंचयत सदस्य, विवीध संस्थचे पदाधिकारी याच्या सह गावतील अनेक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.