बातमी

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : नामनिर्देशनाच्या वेळेत वाढ

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीव्दारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून दिनांक १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहेत. त्यानुसार दिनांक १६ ऑक्टोबरपासून संगणकप्रणालीव्दारे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीव्दारे भरले जात आहे, मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण maha online कडून दूर करण्यात आली आहे. सबब दिनांक १८ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी ११ ते दु. ३ वाजेपर्यंतची वेळ सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *