बातमी

कोल्हापूर जिल्हयात आयुष्यमान भव मोहीम यशस्वीपणे राबविणार – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश आ. गायकवाड

कोल्हापूर – केंद्रशासनाची अत्यंत महत्वाकांक्षी ” आयुष्यमान भव योजना जिल्हयात दि. 17/09/2023 पासून कार्यान्वीत केली असून सदर योजनेचा कालावधी दि. 17/9/2023 ते 31/12/2023 असा आहे. या मोहिमेअंतर्गत आयुष्यमान आपल्या दारी 3.0 आभा (ABHA), गोल्डन कार्ड (PMJAY GOLDEN CARD) नोंदणी आणि वितरण व 18 वर्षावरील पुरुष तपासणी (NATVM), अवयव दान जनजागृती मोहिम, रक्तदान शिबीरे, माता व बाल आरोग्य लसीकरण व पोषण सल्ला, अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील तपासणी इ. उपक्रम विशेष मोहिम म्हणून राबविणेत येत आहेत.

या अंतर्गत मोहीमेची उदिदष्टांमधील आभा कार्ड हे प्रत्येक नागरीकाचे आरोग्य विषयक माहीती उदा. मधुमेह, उच्चरक्तदाब इ. एकत्रीतपणे Online portal वर दर्शविते. आपल्या जिल्हयामध्ये साधारणत: 3850000 आभा कार्ड काढण्याचे उदिदष्ट असून आतापर्यंत जवळपास 14 लाख लाभार्थ्याचे आभा कार्ड काढले आहे.

तसेच गोल्डन कार्ड (PMJAY GOLDEN CARD) एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना ही महत्वाकांक्षी योजना केंद्र व राज्य शासनाद्वारे राज्यात राबविली जात आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास 5 लाखांपर्यंत 1209 आजारांवरती मोफत उपचार दिले जातात. या योजनेचा लाभ आपल्या जिल्हयात एकूण 56 खाजगी व 9 सरकारी रुग्णालयामध्ये घेता येईल. हे कार्ड काढण्यासाठी आपले रेशनकार्ड, आधार कार्ड घेऊन आशा वर्कर, कॉमन सव्र्हस सेंटर, महा ई-सेवा केंद्रे, आपले सरकार केंद्र रुग्णालयातील आरोग्य मित्र यांच्याकडे जावे किंवा स्वतः लाभार्थीही शासनाने निर्गमित केलेल्या मोबाईल Ayushaman App द्वारे हे कार्ड काढू शकतात. आपल्या जिल्हयात एकूण 24,83,000 लाभार्थ्यास आयुष्यमान भारत योजनेमध्ये समाविष्ट केले असून आता पर्यंत एकूण जवळपास 3,18,000 लाभार्थ्यांनी कार्ड काढली आहेत.

आयुष्यमान मेळा जिल्हयामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, तसेच ग्रामीण रुग्णालय, सेवा रुग्णालय येथे 4 आठवडयांच्या स्वरुपात आयोजित केला जात आहे. कोल्हापूर जिल्हा अवयवदान मोहीमेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकावर असून आतापर्यंत जवळपास 3130 च्यावर लोकांनी अवयव दान करण्यासंदर्भात शपथ घेतली आहे व आपली केली आहे.



18 वर्षावरील पुरुष तपासणी (NATVM) ही आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी मोहिम आहे. यामध्ये 18 वर्षे व त्यावरील वयोगटातील पुरुषांचे असंसर्गजन्य आजार, संसर्गजन्य आजार, डोळयांचे आजार इ. साठी सर्व आरोग्य केंद्रावर मोफत तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच शस्त्रक्रिया अंतर्गत पुरुष नसबंदी, हायड्रोसील, हर्निया, पोटाचे विकार इ. शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. त्यासोबत आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबीर, माता-बाल आरोग्य, लसीकरण, पोषण सल्ला इ. कार्यक्रम राबविले जात आहेत.

आयुष्यमान भव मोहिम 100% यशस्वी करण्यासाठी शनिवार दि. 14 ऑक्टोंबर 2023 इ. रोजी श्री. एम. एम. भाट, अध्यक्ष, महा.राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा, कर्मचारी संघटना,शाखा-कोल्हापूर, श्री.कुमार कांबळे, अध्यक्ष, महा.राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा, कर्मचारी संघटना, शाखा- कोल्हापूर, श्री. नितिन कांबळे, अध्यक्ष, हिवताप कर्मचारी संघटना, शाखा कोल्हापूर आणि मा. श्रीम. एस. ए. पालकर नर्सेस संघटना प्रतिनिधी, शाखा कोल्हापूर यांचे अध्यक्ष व प्रतिनिधी आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना शाखा प्रबंधक व जिल्हा समन्वयक आणि CSC सेंटर VLE श्री. विनोद पाटील यांच्या समवेत डॉ. श्री. राजेश गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येऊन, सर्व आरोग्य कर्मचारी संघटनानी यामध्ये उस्फूर्त प्रतिसाद देऊन सदरची योजना यशस्वीपणे पार पाडण्याची ग्वाही श्री. नितीन कांबळे, अध्यक्ष हिवताप कर्मचारी संघटना, कोल्हापूर यांनी देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *