बातमी

गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुरगुड निपाणी मार्गावर मुरगुड येथे रास्ता रोको

मुरगूड ( शशी दरेकर ) : गेले अनेक वर्षे प्रलंबित असणारे आरक्षण मराठा समाजाला वारंवार आंदोलन करून देखील शासनाने अद्याप दिलेला नाही . त्याबाबतीत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सध्या मनोज जरांगे – पाटील हे मराठा समाजासाठी झटत असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच शासनाचे आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजले पासून मुरगुड नाका नंबर एक येते रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

सकल मराठा समाज मुरगुड आणि मुरगुड शहर नागरिक यांच्यावतीने हा रस्ता रोको करण्यात येणार असून याआधी मुरगूड मध्ये मूक मोर्चा, शहर बंद, उपोषण या प्रकारची विविध आंदोलने आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आली आहे.

याचा पुढील भाग म्हणून गुरुवारी मुरगुडचा नाका नंबर एक येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. या बाबतीचे निवेदन मुरगुड पोलीस स्टेशन यांना देण्यात आले यावेळी मुरगुड चे पीआय गजानन सरगर यांनी हे निवेदन स्वीकारले.

यावेळी सकल मराठा समाज, मुरगुडचे कार्यकर्त्यांसह मुरगुड मधील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मुरगुडचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, रणजित सुर्यवंशी, जगन्नाथ पुजारी, डॉ सुनिल चौगले, संजय भारमल, अँड सुधिर सावर्डेकर, सुहास खराडे ,युवराज सूर्यवंशी,अमर चौगले आजी,माजी नगरसेवक, संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *