28/09/2022
0 0
Read Time:4 Minute, 5 Second

कागल : कागलमध्ये आयोजित हरिनाम सप्ताहाची भक्तिभावाने सांगता झाली. २४ व्या वर्षी कागल मध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक प्रयाण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि. ६ मे ते गुरुवार दि. १२ मे पर्यंत श्रीमंत यशवंतराव घाटगे वाड्याच्या मैदानात आयोजित या सोहळ्यात अनेक हरी भक्तांनी आवर्जून हजेरी लावली होती.

      या सोहळ्यात ह.भ.प. सुभाष शिंत्रे (आणूर), ह.भ.प. संभाजी चव्हाण, राजश्री बेहनजी (प्रजापिता ब्रम्हाकुमारी कागल), ह.भ.प. उद्धव जांभळे (निढोरी), ह.भ.प. तुकाराम हजारे (शिरूर), ह.भ.प. अशोक कौलवकर (गारगोटी), ह.भ.प. डॉ.एस.डी.पन्हाळकर, ह.भ.प. एम.पी.पाटील, ह.भ.प. सचिन पवार, ह.भ.प. नवनीत महाराज (करगणी), ह.भ.प. सचिन पवार (पुणे), ह.भ.प. श्रीपाद जाधव (सातारा) यांनी प्रवचन व कीर्तन सादर केले.

      श्री विठ्ठल मंदिर, राधाकृष्ण मंदिर कागल, श्री हनुमान मंदिर भजनी मंडळ कोष्टी गल्ली कागल, श्री महादेव सेवा भजनी मंडळ माळी गल्ली कागल, श्री पवनपुत्र भजनी मंडळ बेघर वसाहत कागल, श्रमजीवी भजनी मंडळ दावणे गल्ली कागल, श्री महालक्ष्मी भजनी मंडळ हणबर गल्ली कागल, श्रीराम मंदिर भजनी मंडळ कागल, श्री हनुमान मंदिर भजनी मंडळ गुरुवार पेठ कागल, कालिकादेवी भजनी मंडळ कागल यांनी हरिजागर केला.   

      रोज सायंकाळी रविराज वाळवेकर, इंद्रजीत नाळे, गहिनीनाथ दुध संस्थेचे चेअरमन अमर दिलीप सणगर, गंगाराम कुंभार, युवराज लोहार, सुरेश पिष्टे, अमित माळगे, रंगराव शेवडे यांनी भोजन व्यवस्था केली होती.

कागलमध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) व शाहू ग्रुपचे चेअरमन राजे समरजीतसिंह घाटगे यांनी सहभाग घेतला. यावेळी श्री.घाटगे यांनी सर्वांसोबत कीर्तनाचा आस्वाद घेतला.

हरिनामाच्या गजरात रंगले मंत्री हसन मुश्रीफ

कागल येथील श्रीमंत यशवंतराव घाटगे वाड्याच्या मैदानात आयोजित हरिनाम सप्ताहात हरिनामाच्या गजरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ भक्तिभावाने रंगले. विठोबा-रखुमाईच्या तालावर टाळ वाजवत ते  तल्लीन झाले. मंत्री श्री मुश्रीफ यांच्या या सहभागाने उपस्थित वारकरी ही भारावले. मुश्रीफ यांनी श्री. विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनानंतर विण्याचे दर्शन घेतले. त्या गर्दीतच एका वारकऱ्यांने मुश्रीफांच्या गळ्यात टाळ अडकविला. टाळमृदंगासह विठोबा-रखुमाईच्या गजरात तल्लीन झालेल्या मुश्रीफांनी आपोआपच ठेका धरला. त्यानंतर सप्ताहानिमित्त तयार केलेल्या प्रसादाचाही मंत्री मुश्रीफ यांनी आस्वाद घेतला

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!