कागल / प्रतिनिधी : राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कागल तालुक्यातील वंदूर येथील ग्रामस्थांनी गावचे दैवत हनुमान देवास महाअभिषेक घातला. नूतन सरपंच सौ दिपाली कांबळे यांच्या हस्ते हा अभिषेक सोहळा पार पडला.
महा अभिषेकानंतर ग्रामविकास आघाडीच्या व ग्रामस्थांच्या वतीने महाआरती करण्यात आली. हसन मुश्रीफ यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांच्यावर आलेले इडीचे संकट लवकरात – लवकर टळो, अशा सद्भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
सरपंच सौ दिपाली कांबळे, उपसरपंच सौ दिपाली रणदिवे, धनश्रीदेवी घाटगे, माजी सरपंच सौ सविता हिरेमठ, मालुबाई कांबळे, रेश्मा माळकर, धनराज घाटगे ,रामचंद्र लोकरे, सागर बागणे ,तानाजी बागणे, महावीर हंचनाळे, उत्तम कांबळे, अनिल गुरव ,गणपती कांबळे, दयानंद कांबळे, नामदेव चौगुले, पारीसा जंगटे, बबन खोडवे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते