बातमी

ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवी मंदिर कलशरोहन सोहळा उत्सव

कागल (विक्रांत कोरे) : येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवी मंदिर लक्ष्मी टेकडी येथे कलशरोहन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कलशरोहन सोहळा व धार्मिक कार्यक्रम परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराज श्री. क्षेत्र दत्त देवस्थान आडी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कलश मिरवणुक शुभारंभ आमदार हसनसो मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच मिरवणूक दरम्यान कलश पूजन माजी उपनगराध्यक्ष यशवंत गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, प्रशासक मुख्याधिकारी श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, प्रकाश गुरव आदींसह कागल येथील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *