वर्षाला दोन एकरात दहा लाखाचे उत्पन्न
व्हनाळी(सागर लोहार) : कागलच्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्र विद्यालय या ठिकाणी इस्राईल तंत्रज्ञानावर आधारित आंबा पेरू चिक्कू सीताफळ नारळ अशा झाडांची लागवड करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान मिळाली पाहिजे या हेतूने संस्थेचे सचिव प्रताप उर्फ भैय्या माने व सुनील माने यांनी दिड एकर जमिन यासाठी राखीव ठेवली आहे यामध्ये सरकारच्या नियमानुसार एकरी 40 झाडे बसत असली तरी या इस्त्राईल तंत्रज्ञानाने एकरी 650 झाडांची लागवड करण्यात आली आहे.
लॉक डाऊन च्या काळात ज्या वेळी इतर शाळा पूर्णपणे बंद होत्या त्या वेळी ही कृषी तंत्र उच्च तंत्रज्ञानाची ही शेती शाळा सुरूच राहिली एरवी दोन कुशल कामगार घेऊन संस्थेला ही शेती सहजपणे करता आली असती परंतु केवळ विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा कोरोना काळातील अडचणींचा विचार करता विद्यार्थ्यांचे असे नवनवीन व्यवसायिक तंत्रज्ञान स्वतः शिकून आपल्या शेतीमध्ये वापरावे यासाठी या कृषी तंत्र विद्यालयाने नॅडप कंपोस्ट गांडूळ खत प्रकल्प आणि जिल्ह्यातील सर्वात मोठा आळंबी प्रकल्प तसेच शेळ्या आणि गाई-म्हशींचे आदर्श गोठे असे आदर्श प्रकल्प राबवले आहेत.
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक माहितीसाठी त्यांना या मध्ये सामावून घेऊन ही इस्राईल तंत्रज्ञानाची शेती करताना मागील वर्षी मार्च महिन्यात मुरमाड जमिनीत तीन फुटाची चर मारण्यात आली या चरीमध्ये पालापाचोळा, गांडूळ खत, शेणखत, 10 26 26 ,यांच्यासह फाॅलिडाॅल पावडर टाकून सरी भरण्यात आल्या आणि 23 जून 2020 ला दोन रोपांतील अंतर चार फूट आणि दोन ओळीतील अंतर सोळा फूट अशा पद्धतीने आंब्याच्या जंबोकेशर ही जात मोठ्या प्रमाणावर लावून परागीभवणासाठी त्यात रत्ना, हापूस, बारमाही अशा जातींची थोडी थोडी रोपे लावण्यात आली आहेत .पेरूची जी विलास या जातीची 270 रोपे लावली आहेत तर इतर पाच गुंठ्यांत सिताफळ, चिक्कूची लागवड केली आहे सरकारच्या कृषी विभागाच्या धोरणानुसार जर रोपे लावण्यात आली असती तर ती एकरी 40 रुपये बसली असती परंतु या तंत्रज्ञानाने एकरी 650 आंब्याची रोपे बसतात.
या तंत्रज्ञानात दोन ओळीतील अंतर सोळा फूट ठेवले असल्यामुळे आंब्याची झाडे दोन्ही बाजूला विशिष्ट पद्धतीने कटिंग करून या सोळा फूट जागेत वाढवली जातात हेच यातील महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे रोपांना ड्रीप च्या साह्याने खते व औषधे दिली जातात हे सर्व करण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च आला असून या फळ पिकांच्या दोन ओळींमधील असणाऱ्या अंतरामध्ये झेंडू पिकाची लागवड करून त्यातून तीन महिन्यात दोन लाखाचे उत्पन्न मिळाले आहे तर त्यानंतर केलेल्या कलिंगड लागवडी मध्ये कोरोना मुळे पन्नास हजाराचा तोटाही झाला आहे परंतु आता केलेले सोयाबीनचे आंतरपीकही चांगले उत्पन्न मिळवून देईल अशी अपेक्षा आहे.
या फळबागेतून पेरू 250ते 300 ग्रॅम वजनाचा एक पेरू मिळतो तर आंबा 400 ते 500 ग्रॅम चा मिळणार आहे त्यातील पेरूच्या बागेने आठव्या महिन्यात प्रति झाड 35 ते 40 फळ याप्रमाणे उत्पादन दिले आहे. हे सर्व उत्पादन स्थानिक ग्राहकांना आवश्यकता भासल्यास दिली जाणार आहे अन्यथा हे सर्व उत्पादन विक्रीसाठी बारामतीच्या बसाळे अँड ब्रदर्स या जगभर आंबे पाठवणा_या कंपनीबरोबर विक्रीसाठी चा करार करण्यात आला आहे त्यामुळे प्रात्यक्षिकांवर आधारित असणारी ही इस्राईल तंत्रज्ञानाची शेती या कृषी विद्यालयातील मुलांना भविष्यात नवी उमेद देऊन शेतीमध्ये व्यवसायिक क्रांती घडवेल यात शंका नाही. या इस्राईल तंत्रज्ञान फळबागेसाठी प्राचार्य डॉ बी एन पाटील,प्रा.शाम भोसले, सचिन पाटील यांनी परिश्रम घेतले.
यशस्वी भावी पिढी घडवण्याचा शाळेचा मार्ग…
या अनोख्या उपक्रमांबाबत बोलताना प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, 1995 पासून ही संस्था विद्यार्थी भिमुख असे उपक्रम राबवत असून या संस्थेतून शिकून बाहेर पडणारा विद्यार्थी नोकरी लागली नाही म्हणून कुढत बसणार नाही या उलट स्वतःचा व्यवसाय निर्माण करून आणखी चार हातांना रोजगार निर्माण करून देईल आणि यातून भावी पिढी घडेल असा मला विश्वास वाटतो.
जिल्ह्यातील एकमेव प्रयोग…
इस्राईल तंत्रज्ञानात प्रथमच अशा पद्धतीने अणून या कृषी विद्यालयाने दोन एकर क्षेत्रावरील शेतीच्या बांधवांचा देखील खुबीने वापर केला आहे बांधावरील रिकाम्या जागेत नारळ पिकाची लागवड केली फळबागेच्या संरक्षणासाठी विदेशातील शात आकर्षक कुंपणाच्या वनस्पतीही लावण्यात आली आहे भविष्यात ऍग्रो टूरिझमचा विचार करून बागेच्या सभोवती चार चाकी वाहने पावसाळ्यातही फिरू शकतील अशी रस्त्यांची व्यवस्था देखील याठिकाणी केली आहे.
.