बातमी

कै. दिपक वर्णे यांच्या विचार व संस्काराचा प्रकाश सर्वदूर पोहचवा ! –रामकुमार सावंत

मुरगूड ( शशी दरेकर ) – शिक्षकांच्या ज्ञानदानातून व संस्कारातून विद्यार्थी सुसंस्कारीत होवून मोठा होतो . तेंव्हा शिक्षकही मोठा होतो .विद्यार्थ्याच्या मोठेपणातून शिक्षकांचा सन्मान वाढतो . मुरगूडमधील कवी मनाचे लेखक कै दिपक वर्णे यांच्या विचारांचा व संस्काराचा प्रकाश सर्वत्र पसरवा असे प्रतिपादन माजी प्राचार्य रामकुमार सावंत यांनी मुरगूड येथे केले .

येथील दिवंगत कवी व लेखक दिपक वर्णे यांच्या ११ व्या स्मृतीदिन कार्यक्रमात श्री सावंत बोलत होते . अध्यक्षस्थानी धरणग्रस्त नेते शिवाजीराव गुरव होते तर ज्येष्ठ पत्रकार बाळ कालेकर , मुरगूड पालिका मुख्याधिकारी ‘संदीप घार्गे ‘ पोलीस निरीक्षक ‘गजानन सरगर ‘ प्रमुख उपस्थित होते .

यावेळी शिवाजीराव गुरव यांनी माहितीचा अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले . प्रारंभी कैं दिपक वर्णे यांच्या प्रतिमेचे पूजन दलितमित्र डी.डी. चौगले यांच्या हस्ते करण्यात आले . कै . दिपकच्या विचारांचा व संस्काराचा प्रकाश सर्वदूर पोहचवण्याचे आवाहन करून लेखक अशोक दरेकर व सर्वोदयचे भिमराव कांबळे यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला .

स्वागत निवृत्त गट शिक्षणाधिकारी पी .आर. पाटील यांनी केले . सामाजिक कार्यकर्ते प्रदीप वर्णे यांनी प्रास्ताविक केले . या कार्यक्रमास नंदकुमार वर्णे ‘ सदाशिव एकल ‘ छाया शिगावकर , हणमंत हावळ , सिकंदर जमादार बळीराम पाटील , किशोर पाटील , विष्णु कुंभार , भानुदास वंडकर ‘ जोतीराम सुर्यवंशी , वसंत कुंभार आदि उपस्थित होते .विनायक हावळ यांनी आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *