मुरगूड ( शशी दरेकर ) – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत साक्षी तेली उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. साक्षी ने प्राप्त केलेले यश हे आजच्या युतीसाठी प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन मुरगुड चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी केले ते मुरगुड येथे सत्कार प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. बी. मेंडके तर प्रमुख उपस्थिती आनंदराव कल्याणकर होते.
यावेळी युवा नेते दिग्विजय पाटील, शिवाजीराव सातवेकर , नगरसेवक राहुल वंडकर,जगन्नाथ पुजारी, राजेंद्र चव्हाण, राजू आमते, दिग्विजय चव्हाण, नंदकुमार दबडे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
प्रसंगी साक्षी तेली म्हणाल्या माझा सत्कार हा मला प्रेरणा देणारा आहे. माझ्या यशात माझे पती व दीर व गावातील लोकांचे मोलाचे सहकार्य आहे. माझ्या नऊ वर्षाच्या मुलगीचा सांभाळ करीत कोरोणामुळे परीक्षा पुढे ढकलल्या तरीही खचून न जाता अन संसारात रमूनही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे व तुमच्या सर्वांच्या प्रेरणेने यशस्वी झाले.
स्वागत राजेंद्र चव्हाण यांनी केले तर प्रस्ताविक सुधीर सावर्डेकर यांनी केले तर आभार बाळासो पाटील यांनी मानले.