मुरगूड ( शशी दरेकर ) : रणजीतसिंह पाटील यांनी माझ्या राजकीय भावी वाटचालीबद्दल जे वक्तव्य केलं आहे .त्यामुळे आपल्याला दहा हत्तीचे बळ मिळालं आहे असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केले.
सहकार महर्षी विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या जयंती निमित्त येथील सानिका स्पोर्ट्स फौंडेशन यांच्यावतीने ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी येथील प्राथमिक शाळा व शिवराज विद्यालय ,व मुरगूड विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी शिवछत्रपती पुरस्कार स्वाती शिंदे , मंडल कृषी अधिकारी प्रतिक्षा शेणवी , श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे नुतन संचालक श्री . निवास कदम यांचा सत्कार करण्यात आला.
श्री घाटगे म्हणाले रणजीतदादा, काहीही वेगळा निर्णय घेत नाही .आपण पक्षातच राहणार आहोत . कागल विधानसभा मतदारसंघात काम करत राहणं , लोकांच्या सेवेत राहुन त्यांचे आशीर्वाद मिळवत राहणार आहोत . त्यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य मिळत राहू दे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी गोकूळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील यांनी सरकार मध्ये कोण आलं याला महत्व देऊ नका . येईल त्या प्रसंगाला तोंड देत गेलात तर पुढचे दिवस आपलेच आहेत . उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेले निर्णयाचे परिणाम एक दीड वर्षांमध्ये दिसतील अन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर हे सगळं तुमच्या पत्त्यावरच पडणार असल्याचे सांगितले . यावेळी पांडूरंग कुडवे यांनी मनोगत व्यक्त केले.
आग्र्याहून सुटका
जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी तहात अनेक किल्ले दिले . आग्र्याला जावे लागले . तिथेही मानहानी पत्करावी लागली. नजरकैदेत राहिले. अनेक संकटाशी सामना करीत राजांनी आपली सुटका करून घेतली. समरजितदादा
तुम्हालाही तसच करून आपली सुटका करून घ्यायची आहे असे उद्गार रणजितसिंह पाटील यांनी काढले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संजय पाटील , बिद्री चे माजी उपाध्यक्ष दत्तामामा खराडे , शाहुचे संचालक सुनिल मगदूम , सुनिलराज सुर्यवंशी, भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष प्रताप पाटील, शाहु कृषी संघाचे चेअरमन अनंत फर्नाडिस, प्राचार्य एस आर पाटील, नवनाथ सातवेकर,विलास गुरव ,प्रवीण चौगले,विजय राजिगरे,, , पांडूरंग कुडवे ,अमर चौगले ( छोटू ), सागर सापळे , गणेश तोडकर , निशांत जाधव , राहुल खराडे . विजय राजिगरे, सुरज मुसळे, नाना जाधव,जयव़त पाटील,यांच्यासह विद्यार्थी , कार्यकर्ते उपस्थित होते . सानिका स्पोर्ट्स चे अध्यक्ष सुशांत मांगोरे यांनी स्वागत केले.प्रास्ताविक सानिका स्पोर्ट्स चे संस्थापक दगडू शेणवी यांनी केले .सुत्रसंचालन मुरगूड विद्यालयाचे अध्यापक एम बी टिपुगडे यांनी केले. तर आभार राजू चव्हाण यांनी मानले.
मुरगूड : सानिका स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी समरजीतसिंह घाटगे,रणजितसिंह पाटील,दत्तामामा खराडे ,दगडू शेणवी ,सुनीलराज सुर्यवंशी व अन्य