ग्रामपंचायत पिंपळगाव खुर्द यांनी केले होते आयोजन
सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : पिंपळगाव खुर्द ता कागल येथे ग्रामपंचायत पिंपळगाव खुर्द तर्फे कौशल्य विकास अंतर्गत महिला प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये महिलांना प्रशिक्षण देऊन त्याना प्रशिस्तीपतत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी सौ.आमरीन मुश्रीफ होत्या.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ मुश्रीफ म्हणाल्या, माऊली संस्थेमार्फत व ना. मुश्रीफ साहेबांच्या मार्फत KDCC बँकेच्या माध्यमातून खंबीरपणे महिलांच्या पाठीशी उभे राहू. महिलांना स्वतःचा व्यवसायात मदत करू.
गावच्या सरपंच शीतल नवाळे म्हणाल्या,वर्क फ्रॉमच्या युगात महिलांनी फक्त घरकामात अडकून न राहता घेतलेल्या कौशल्याचा उपयोग करून घराला हातभार कसा लावता येईल याचा विचार करावा.
यावेळी अशोक नवाळे,जे डी कांबळे,पिंटू कांबळे,श्रद्धा पाटील,संध्या तेलवेकर, पूजा मगदूम आदीं सह अनेकांनी आपले मनोगते व्यक्त केली.
उपसरपंच श्री सदाशिव चौगुले, महेश चौगले,अशोक वठारे,ग्रामसेवक सौ राजश्री जिरगे,कविता चौगले ,सर्व ग्रामपंचायत सदस्य आदीसह महिला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक संध्या पोवार यांनी केले तर आभार असिफ शेख यांनी मानले.
फोटो-