मुरगूड ( शशी दरेकर ) – संततधार पावसामुळे वेदगंगेचे पाणी झपाट्याने वाढत जाऊन मुरगूड-मुदाळ तिट्टा मार्गावर निढोरी दरम्यान स्मशानभूमिजवळ पूराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतूकीसाठी बंद झाला आहे.
संततधार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे . त्यामुळे मुरगूड पोलीस प्रशासनाने बॅरिकेट लावून-वाहतूकीसाठी हा रस्ता बंद केला आहे. रस्ता काँक्रिटीकरणास खोदकाम केल्यामुळे पाण्यातून वाहतूक करण्यास धोका निर्माण झाला आहे . त्यामुळेच प्रशासनाने हे पाऊल उचलले.
दरम्यान मुरगूड, शिंदेवाडी,यमगे या गावानां पिण्याचे पाणी पुरवठा .करणाऱ्या सरपिराजीराव तलावाच्या पाणीसाठयातही झपाटाने वाढ होत आहे. त्यामुळे या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.