संपादकीय

बहुजनांच्या प्रतीकांची मोडतोड खपवून घेतली जाणार नाही

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले. पण जाता जाता राजकारणाचे तत्त्वज्ञानही भाजपला शिकवले. मेजर ध्यानचंद हे प्रसिद्ध हॉकीपटू, जागतिक ऑलम्पिक मध्ये त्यांनी हॉकी खेळामध्ये भारताला पदके मिळवून दिली. त्यांनी देशासाठी महान पराक्रम केला. त्यांनी देशासाठी केलेल्या सेवेसाठी सारा देशाला अभिमान आहे. त्यांच्या नावाला कोणाचाच विरोध असणार नाही. परंतु माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांचे नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचे नाव घालण्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या पुरस्काराला ध्यानचंद यांचे नाव देण्यास हरकत नव्हती  किंबहुना कॉंग्रेसने मेजर ध्यानचंद लाइव्ह अचीवमेंट असा यांच्या नावाने एक पुरस्कारही देण्यास सुरुवात केली. स्वर्गीय राजीव गांधी काँग्रेस पक्षाचे आहेत म्हणून त्यांचे नाव बदलणे, यावरून भाजप पक्ष किती खालच्या पातळीवर जातो हे तमाम भारतीयांच्या लक्षात आले. देशाच्या प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाचा माणूस आहे. त्यांना हा निर्णय मान्य असणे कधीच शक्य नाही. देशाच्या इतिहासात तीन गांधींचे खून झाले. जगन्मान्य महात्मा गांधी, स्वर्गीय इंदिरा गांधी आणि स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. या तीन गांधींना  ठार करणाऱ्या मनोवृत्तीचा अनेक वेळा धिक्कारही झाला आहे. तिन्ही गांधींना ठार मारले तरी त्यांचे विचार मारेकऱ्यांना संपविता आले नाहीत. मारणाऱ्या पेक्षा मरणारे मोठी झाले असा भारतीय इतिहास सांगतो. स्वर्गीय इंदिराजी खून झाला म्हणून राजीवजी घाबरली नाहीत. भिती हा शब्द गांधी घराण्याला माहीत नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे गांधीजी जगाला प्रेरणादायी ठरले. या देशातील राजकीय खून एक विशिष्ट अशी मनोवृत्तीच करते हे साऱ्या देशाला ठाऊक आहे. या मनोवृत्तीने गांधीजींना, इंदिराजींना, राजीवजींना, काँ. गोविंदराव पानसरेना, डॉ. नरेंद्र दाभोळकराना, डॉ. कलबुर्गी यांना ठार केले. ज्यांचे रक्ताने हात माखले, त्या मनोवृत्तीला साऱ्या देशाने ओळखले आहे. त्या मनोवृत्तीला ठेचून काढले पाहिजे. सध्या देशासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. महागाईने सर्वोच्च कळस गाठला आहे. पेट्रोल, डिझेल महाग झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. देशाला पोसणारा शेतकरी, अन्नदाता त्या दिल्लीच्या रस्त्यावर आपल्या न्याय मागण्यासाठी गेले नऊ महिने बसला आहे. त्याची कोणी विचारपूस करत नाही. त्यांचे आंदोलन उन, पाऊस, थंडीमध्येहि चालू आहे. त्या आंदोलनाला भारतातील सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षातील चांगल्या नेत्यांच्या पाठीमागे ईडीच्या चौकशा लावून त्यांना बदनाम करण्याची चालले आहे. देशाच्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेकडे नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाचे लक्ष नाही. राज्याच्या जीएसटीचा परतावा त्या राज्यांना वेळेत मिळत नाही त्यामुळे राज्यांच्या कारभार नीट चालत नाही. सहकाराकडे कायमपणे संशयाने पाहणे. त्यातून असे वाटते की, या अपेक्षेने देशातील लोकांनी भाजपला सत्तेत आणले त्यांची प्रचंड निराशा झाली आहे. आपल्या कोत्या मनोवृत्तीचे अनेक वेळा प्रदर्शन करून भारतीय जनता पक्षाने रोष ओढावून घेतला आहे. गेल्या ७५  वर्षांमध्ये देशातील लोक शाहणे झाले आहेत. त्यांना देशातील बऱ्या वाईट गोष्टी कळतात. सत्तेच्या जोरावर चाललेला स्वैराचार या देशातील सुज्ञ जनतेने अनेकवेळा मताच्या पेटीतून मोडून काढला आहे. भाजपाच्या चुका लोक मताच्या पेटीतून मतदार दाखवून देतील.

भारतीय भूमीला अनेक क्रांतिकारकांच्या  बलिदानामुळे पावित्र्य लाभले आहे. जागतिक स्तरावर आपला देश लोकसंख्येने फार मोठा आहे. तिथे लोकशाही रुजणार नाही असे जगातील अनेक विचारवंतांना वाटत होते. भारतातील लोकात निरक्षरांची संख्या जास्त असल्याने लोकशाही  स्वीकारणार नाहीत परंतु गांधी, नेहरू, पटेल, आझाद, राजेंद्रप्रसाद या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी भारतीय जनतेला विश्वासात घेऊन लोकशाहीची पाळेमुळे घट्ट केली. जगाने आदर्श घ्यावा अशी भारतामध्ये लोकशाही बळकट झाली आहे. काँग्रेसच्या काळात मोठी धरणे, मोठे उद्योग झालेने प्रचंड लोकसंख्या असलेला देश स्वबळावर गुण्यागोविंदाने जगत आहे. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आदी प्राथमिक गरजा मिळत असल्याने देशातील जनता सुखाने जगत आहे.

खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्याने अनेक प्रश्न बाहेर येत आहेत. अनेक पराक्रमी माणसांचा इतिहास देशातील लोकांच्या समोर जाऊ द्यायचा नाही असे षड्यंत्र चालू आहे. काही पराक्रमी लोकांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ नये याची खबरदारी घेतली जाते असा संशय येतो, त्यांच्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळात आपली माणसे घुसवून होऊन पराक्रम नसताना तो चिकटवून खरा इतिहास बाजूला ठेवला जात आहे. देशासाठी बलिदान करणाऱ्या पराक्रमी वीरांच्या इतिहास नव्या पिढीसमोर कधी जाणार असा  प्रश्न आहे, मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले टाकणार नाही असे पाठ्यपुस्तकातील पुस्तकातील धडे आम्ही किती दिवस वाचायची १३ डिसेंबर १९४२ रोजी गारगोटी येथे बलिदान दिलेल्या सात हुतात्म्यांचा इतिहास विद्यार्थ्यांच्या समोर का येत नाही ? ७५ वर्षांमध्ये क्रांतीकारांच्या बलिदानाचा इतिहास कधीच आला नाही. क्रांतिकारकांनी केलेला त्याग आपल्याला पेन्शन मिळावी, आपल्याला सत्तेचे पद मिळावे म्हणून रक्त सांडले नाही.  इंग्रजांना हाकलुन लावल्यानंतर आपले भारतीय बांधव सुखी होतील, ते गुलामगिरीतून मुक्त होतील एवढीच स्वच्छ भावना त्यांच्याकडे होती. त्यांचा इतिहास नवीन युवकांना समजला पाहिजे, पाठ्यपुस्तक मंडळात  आपली माणसे पाठवून हा पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीसमोर आला पाहिजे म्हणून आत्ताच्या शिकलेल्या तरुणाने आपल्यासमोर अभ्यास करताना काय येते याचाही विचार करावा. आतापर्यंत बहुजन समाजाच्या आदर्शांची सर्व प्रतीके पाठ्यपुस्तकातून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला. आता आम्ही शिकलो आहेत. आता हे  खपवून घेतले जाणार नाही. स्वर्गीय राजीव गांधीचे नाव बदलणे ही छोटी गोष्ट वाटत असली तरी त्यांच्या पाठीशी असणाऱ्या असणाऱ्या प्रतिगामी व्यापक विचार आपल्या लक्षात आला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *