मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल पाटील कॉलनीतील ज्ञानदानाचे कार्य करणारी स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतील यश संपादन करून नोकरीमध्ये विविध शासकीय पदावर कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्यासिकेचे मार्गदर्शक श्री . सुनिल रणवरे ( माजी नगरसेवक ) हे होते. यावेळी अभिषेक गोते ठाणेवाडी ( अग्नीवीर ), अजिंक्य गुरव सोनगे ( इंडियन आर्मी ), अमर चौगले चिमगांव ( इंडियन आर्मी ), अक्षय बरकाळे वाघापूर ( मुंबई पोलिस ), सौरभ बोंगार्डे बानगे ( मुंबई पोलीस ), युवराज आस्वले दौलतवाडी ( पशुसंवर्धन पर्यवेक्षक), श्रीकांत पोवार पिराचीवाडी ( आयकर विभाग मुंबई ) , ऋतूराज कांबळे हळदी ( इंडियन नेव्ही ) यांचा यथोचित सत्कार करुन संस्थेमार्फत अभिनंदन करण्यात आले.
या सत्कार प्रसंगी सुनिल रणवरे म्हणाले विद्यार्थ्यांना स्वतंत्र खूर्ची -टेबल वायफाय, नेट कनेक्शन , भरपूर प्रकाश , स्वच्छ मोकळी हवा , सुंदर झाडी अशा वातावरणात विद्यार्थीचे मन प्रसन्न राहून एकाग्रतेने स्पर्धा परिक्षेला अभ्यास व्हावा या उद्देशाने ही अभ्यासिका चालवली जात आहे .विद्यार्थ्यांच्या इतर ज्ञानात भर पडावी म्हणून वाचनासाठी पुस्तके , वर्तमानपत्रे, विविध मासिके ठेवली जातात असे ते म्हणाले.
सदर अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांना आपले करीयर घडवण्यास नक्कीच यश मिळेल असे मत अभ्यासिका चालविणारे विराज रणवरे , प्रसाद रणवरे , अथर्व रणवरे यानीं व्यक्त केले.