कागल (विक्रांत कोरे) : कोणत्याही धर्माबाबत आक्षेपार्ह संदेश किंवा इतर धर्मियांच्या भावना दुखावणारे व्हाट्सअप संदेश, व्हायरल केल्यास, त्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करणार असल्याचे पत्रक कागल पोलीस ठाण्याने प्रसिद्ध केले आहे.
कोणत्याही धर्मबाबत आक्षेपार्ह टिपणी असणारे किंवा इतर धर्मियांच्या भावना दुःखविणारे व्हाट्सअप संदेश अथवा स्टेटस ठेवू नयेत. अशा स्टेटस बाबत कोल्हापूरचे सायबर सेल कडून व कागल पोलीस ठाण्याकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. असा कोणताही आक्षेपार्ह संदेश व्हायरल झाल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता बिघडेल असे कोणतेही कृती करू नये असे आवाहन कागल पोलीस ठाण्यातून करण्यात आले आहे