मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल बाजारपेठेतील शिवप्रेमीतर्फे हिंदूहृदयसम्राट ” बाळासाहेब ठाकरे ” यांचा १०वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.
प्रथम हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त पोलिस मा . श्री .निवासराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले . फोटो पूजनानंतर दोन मिनिटे स्थब्धता पाळून ठाकरे यानां आदरांजली वाहण्यात आली.
यानंतर माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या चितावणीखोर विधान करण्यात प्रसिध्द होते . आणि त्यामुळे त्यांच्यावर अनेक खटले दाखल होते . त्याला न डगमगता त्यानीं लोकहिताचे कार्य करुन अनेकांच्या हृदयात स्थान मिळवले. शिवभक्त धोंडीराम परीट यानीही बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या स्मृतीदिन कार्यक्रमास मा . श्री .निवासराव कदम , माजी नगराध्यक्ष श्री . राजेखान जमादार , शिवभक्त श्री .धोंडीराम परीट यांच्यासह माजी नगरसेवक विशाल सुर्यवंशी , प्रविण सुर्यवंशी , शशी दरेकर, रामचंद्र पोळ ( सर ), मिलिंद जोशी , जितेंद्र मिठारी , पिंटू रणवरे , पुरशोत्तम देसाई , रणजीत मांगले , यांच्यासह शिवप्रेमी , नागरीक , मोठ्या संख्येने उपस्थित होते .