बातमी

श्रद्धा वालकर हत्येच्या निषेधार्थ मुरगूडमध्ये निषेध फेरी

मुरगूड (शशी दरेकर) : करवसईच्या २७ वर्षीय श्रद्धा वालकरच्या जीवावर बेतले आणि वसईच्याच आफताब अमीन पूनावाला ने अमानुष हत्या केली . निर्दयी आरोपीस शासन झाले पाहिजे व श्रद्धाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. मुरगुड तालुका कागल येथे नाका नंबर एक पासून निषेध फेरी काढण्यात आली. ही निषेध फेरी बाजारपेठ मार्गावरून तुकाराम चौक येथून या फेरीची सांगता मुरगुडच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात करण्यात आली.

यावेळी सानिका स्पोर्ट्स संस्थापक अध्यक्ष दगडू शेणवी यांनी बोलताना सांगितले की श्रद्धा वालकर या मुलीची आरोपी आफताब ने अत्यंत अमानुषपणे हत्या केली असून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसे झाले तरच हे प्रकार थांबतील . ओंकार पोतदार यांनी बोलताना सांगितले की भारतामध्ये याआधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांसाठी कठोरात कठोर कायदा होण्याची गरज आहे. जर तो कायदा झाला तर असे प्रकाराना आळा बसेल. तसेच आरोपीला कठोर शासन होणे गरजेचे आहे.

ज्या अमानुषपणे त्याने श्रद्धाची हत्या केली आहे ते पाहता त्याला फाशीची शिक्षा होणे योग्य आहे उज्वला कांबळे, सुरेखा पाटील आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी वैष्णवी कळमकर आणि विकी साळोखे यांनी मनोगते व्यक्त केली. सर्वांनीच या मनोगतामध्ये अशा कृत्यासाठी कठोर शिक्षेचा कायदा झाला पाहिजे आणि आरोपीला फासी झाली पाहिजे अशी मागणी केली.

यावेळी पांडूरंग कुडवे, निवास कदम, बिंदू चौगुले, नंदकिशोर खराडे, निशांत जाधव, सुशांत मांगोरे, सागर सापळे, पांडुरंग मगदूम, युवराज सूर्यवंशी, सर्जेराव भाट, प्रशांत कूडवे, पृथ्वीराज चव्हाण ,सोन्या मोरबाळे , प्रशांत शहा , धोंडीराम परीट ( शिवभक्त ), रणजीत मोरबाळे , विजय मोरबाळे , प्राचार्य -मिलिंद जोशी , समाधान बोते, महादेव खराडे , निखील जाधव ( मेजर ) , राजू सावंत ( मेजर ), बंडा खराडे, यांच्यासह महाविद्यालय विद्यार्थी – विद्यार्थिनी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *