बातमी

निसर्गाकडे चला, तो आपले जीवन आनंदी बनवेल – वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी

मुरगूड ( शशी दरेकर ) – निसर्ग सर्वात मोठा दाता आहे . जो सर्वांना मुक्त हस्ते भरभरून देतो त्याच्याशी कृतघ्न होऊ नका . त्याला ओरबडू नका . कृत्रिम जीवनातून मिळणाऱ्या क्षणिक सुखाने मानवी जीवन यातनामय बनत आहे. निसर्गाकडे चला , तो आपले जीवन आनंदी बनवेल . असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले ते सावर्डे बु॥ (ता . कागल) येथे समाजभान फौंडेशनच्या वतिने आयोजित संस्कार शिबीरात शिबीरार्थींना मार्गदर्शन करतांना बोलत होते . कार्यक्रमास प्रा.के. बी. पाटील,पांडुरंग महाजन, सागर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

https://app.turtlefin.com/products/credit-card/public?partnerId=630e5137e72e970ef99f3b99

श्री प्रविण सुर्यवंशी यांनी प्रारंभी शिबीरार्थींना परिसरातील वृक्षांची माहिती दिली त्याचबरोबर रोप निर्मीती , वृक्षारोपण, डोंगरमाथी बियांची हवाई पेरणी याबाबत माहिती स्पष्ट केली तसेच शिबीरामध्ये असतांना बीया जमा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

     स्वागत व प्रास्ताविक समाजभान फाउंडेशनचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी केले. तर आभार जगदीश कांबळे यांनी मानले
   यावेळी अजित कांबळे, विठ्ठल पाटील, नंदकुमार हिरुगडे यांचेसह शिबीरार्थी विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *