बातमी

कागलमध्ये श्री बृहद गणधर वलय आराधना महोत्सवास प्रारंभ

जैन समाजात उत्साह : तपस्विची उपस्थिती

कागल (विक्रांत कोरे) : येथील 1008 भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकर जीन मंदिर व जीनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव द्विद्वादश वर्षानिमित्त समस्त जैन समाजाच्या वतीने बृहद गणधर वलय आराधना महामहोत्सवाला सोमवार दि. 13 रोजी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सौधर्म इंद्र इंद्राणी यांच्यासह सर्व सवालधारक यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वा. हत्ती, घोडे यावरून भगवंत, जलकुंभ मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर मंडप उद्घाटन, ध्वजारोहण. कलश प्रतिष्ठा, अखंड दीप स्थापना करण्यात आली.

त्याचवेळी आचार्य श्री सुयश गुप्तजी महाराज, मुनीश्री तत्त्वार्थ नंदीजी महाराज यांचे कार्यस्थळावर आगमन झाले. त्यानंतर पंचामृत अभिषेक करून  महाशांतीमंत्र करण्यात आला. महाहोम , अंकुरा रोपण करण्यात आले. 11 वा. सामूहिक व्रतबंधन, बृहद गणधर वलय विधानाला प्रारंभ झाला. सायंकाळी 5 वा. आचार्य मुनींचे प्रवचन झाल्यावर समवशरणावर रत्नवृष्टी करण्यात आली. 6 वा. हत्तीवरून सवाद्य जीन शास्त्र मिरवणूक काढण्यात आली. रात्री 8 वा. सामूहिक जप, आरती करण्यात आली. या सर्व धार्मिक कार्यक्रमांसाठी परिसरातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या महोत्सवसाठी विधानाचार्य उमेश उपाध्ये, समेध उपाध्ये,  गुणवान उपाध्ये, संतोष उपाध्ये, महेश उपाध्ये, अरिहंत उपाध्ये,  निशांत उपाध्ये, बाबू उपाध्ये, प्रशांत उपाध्ये पुजा विधी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *