पैसे तिप्पट करून देतो सांगून केली फसवणुक
कागल/प्रतिनिधी : रक्कम तिप्पट करून देतो असे सांगून नोटांच्या बदल्यात बंडलामध्ये कोरे कागद घातले व फसवणूक केली.या कारणावरून तिघांवर कागल पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटकातील दोघांना अटक करण्यात आली आहे, तर कागल तालुक्यातील एक जण फरारी झाला आहे. ही घटना कागल तालुक्यातील बेलवळे येथील एका फार्म हाऊस वर तारीख 7 जानेवारी रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
मेहरूम अल्ताफ सरखवास वय वर्षे 41 राहणार 21 फुटी रोड, कप्पया स्वामी मठाजवळ घटप्रभा, तालुका गोकाक जिल्हा बेळगाव, सलील रफिक सय्यद वय वर्षे 30, गणपती मंदिराजवळ धुपदाळ घटप्रभा, तालुका- गोकाक जिल्हा -बेळगाव ही अटक केलेल्यांची नावे आहेत. तर अशोक बापू पाटील राह- बेलवळे, तालुका -कागल हा फरारी असल्याचे पोलिसातून सांगण्यात आले. उमेश तुकाराम शेळके वय वर्षे 33 राहणार रेल्वे स्टेशन जवळ तळेगाव- दाभाडे यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली आहे.
कागल पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी अशोक बापू पाटील राहणार बेलवळे तालुका कागल यांचे बेलवळे येथे फार्म हाऊस आहे. अशोक पाटील यांच्या सांगण्यावरून खया नोटांच्या रकमेचा व्हिडिओ तयार करून उमेश शेळके यांना पाठविला. तारीख 7 जानेवारी रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास उमेश शेळके यास अशोक पाटील यांच्या फार्म हाऊस वर बोलावण्यात आले. मेहरून व सलील यां दोघांनी रुपये 500 च्या दराच्या चलनी नोटा असलेले एक लाख रुपये स्वीकारले.
त्या बदलात उमेश यांना तीन लाख द्यायचे होते. कोऱ्या कागदाचे नोटांच्या आकाराच्या बंडलावर, खालील व वरील बाजूस पाचशे रुपये दराची एक एक नोट लावली व आतील बाजूस नोटांच्या आकाराचे कोरे कागद असलेले सहा बंडल देऊन तीन लाखाच्या बदल्यात रुपये सहा हजार दिले. त्यामध्ये रुपये 6000 च्या ख-याखु-या नोटा होत्या. उर्वरित बंडलामध्ये सर्व कोरे कागद होते. त्यामुळे रुपये 94 हजाराची फसवणूक झाली आहे.
कागल पोलिसांनी रोख रुपये 1 लाख 3 हजार 630,चार मोबाईल हँडसेट, मशीन लिक्विड व इतर साहित्य असे सुमारे 1 लाख 43 हजार 770 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. कागल पोलिसात गुन्हा नोंद आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करीत आहेत
I was reading some of your blog posts on this site and I believe this internet site is rattling instructive!
Keep posting..