
मुरगूड (शशी दरेकर): लोकायुक्त कायदा विधेयक राज्य सरकारने त्वरीत मंजूर करण्याच्या मागणीसंदर्भात उठाव करण्यासाठीआण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्यावतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मुरगुड येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते जिल्हाध्यक्ष नारायण पोवार जनजागृती करताना म्हणाले ‘राज्यात लोकायुक्त कायदा झाल्यास अनेक भ्रष्टाचारी अधिकारी व नेत्यांवर कारवाई होईल. हा कायदा नसल्याने भ्रष्टाचार उघड होवून ही कायद्यातील त्रुटीमुळे कारवाईस अतिशय विलंब होत आहे. आण्णा हजारे यांच्यासोबत राज्य सरकारच्या अनेक बैठका झाल्या.
लोकायुक्त विधेयक तयार ही झाले आहे. पण तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही या विधेयकास वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत . लोकायुक्त विधेयक मंजूर झाल्याशिवाय भ्रष्टाचाराला व गैर कारभाराला आळा बसणार नाही . लोकायुक्त विधेयकासाठी जनतेने रस्त्यावरील आंदोलनासाठी तयार रहावे.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रदीप वर्णे यांनी केले तर प्रास्ताविक पापा जमादार, यांनी केले.
अध्यक्ष स्थानी किशोर पाटील हे होते. व माजी नगरसेवक एस .व्ही. चौगले ( सर ) व ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर प्रमुख उपस्थित होते . विकास सावंत यांनी सूत्रसंचालन केले .विनायक हावळ यांनी आभार मानले.